चित्रपट असो किंवा खऱ्या आयुष्यातील एखादी घटना प्रत्येक स्थितीत तटस्थ उभं राहणं हे प्रत्येक कलाकाराला जमतं. सध्या अभिनेता गष्मीर महाजनी सुद्दा आयुष्यातील अशाच एका दुःखद घटनेला आणि त्यावरू
होणाऱ्या ट्रॉलिंग सामोरा जातोय. अभिनेते रवींद्र महाजनी म्हणजेच गश्मीरचे वडील यांचं काही दिवसांपूर्वी अकाली निधन झालं. पण त्यानंतर अनेकांनी गश्मीरला दोष देत त्याच्यावर टीका केली. स्वर्गीय अभिनेते रवींद्र महाजनी कुटुंबा पासून लांब राहत होते शिवाय त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्या सोबत कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नव्हती. यावरून देखील गश्मीर आणि कुटुंबाला प्रेक्षकांच्या टिकेला सामोरं जावं लागलं. गष्मीर ने बऱ्याच कालावधी नंतर या सर्व टीकेला उत्तर दिलं होतं. “ते माझे वडील होते तुम्हा सगळ्यांपेक्षा मी त्यांना जास्त ओळखतो” गश्मीरचं हे उत्तर टिकेकऱ्यांना काहीस शांत करून गेलं. परंतु पुन्हा एकदा काही नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर गश्मीरचं खरमरीत उत्तर पाहयला मिळालं.(gashmeer mahajani on ravindra mahajani)
नेटकऱ्यांवर भडकला गश्मीर(gashmeer mahajani news)
गश्मीरने बऱ्याच कालावधी नंतर त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून चाहत्यांशी संपर्क साधला. या वेळी अनेक चाहत्यांनी गश्मीर आणि कुटुंबाची विचारपूस केली तसेच गश्मीर पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी दिसणार या बाबत देखील विचारणा केली त्यावर गश्मीरने ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. प्रश्न विचारणाऱ्या या चाहत्यांपैकी काही चाहत्यांनी पुन्हा एकदा गश्मीरला वडील रवींद्र महाजनी यांच्या बद्दल काही प्रश्न विचारले आणि त्यावर गश्मीरने ही चांगलंच खरमरीत उत्तर दिलं. चाहत्यांपैकी एकाने विचारलं “काही अशा गोष्टी आहेत का ज्या तू तुझ्या वडिलांना सांगितल्या नाहीस” त्यावर गश्मीर त्याला उत्तर देत म्हणाला “मी माझ्या वडिलांना काय सांगितलं आणि काय नाही हे मी तुला का सांगू”.
हे देखील वाचा – “तुमच्या पेक्षा मी त्यांना जास्त ओळखतो”गश्मीरचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
चाहत्यांपैकी आणखी एकाने “तुम्ही तुमच्या वडिलांना थोडक्यात काय सांगू इच्छिता?” असा प्रश्न केला यावर गश्मीरने “मी माझ्या वडिलांना काय सांगायचे आहे ते १३ दिवसांच्या विधींमध्ये सांगितले आहे. तुम्हाला त्याबद्दल जाणून घेण्याची काहीही गराज नाही” असं उत्तर दिलं आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधना नंतर होणाऱ्या ट्रोलिंगला गश्मीर ही खरमरीत शब्दात प्रतिउत्तर देताना दिसतोय.(gashmeer mahajani troll)