बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोणचा गरोदरपणातील फोटो समोर, बेबी बम्प दिसल्यानंतर रंगली चर्चा, तर रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लग्नाचे फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
deepika padukone baby bump

दीपिका पदुकोणचा गरोदरपणातील फोटो समोर, बेबी बम्प दिसल्यानंतर रंगली चर्चा, तर रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लग्नाचे फोटो

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह सध्या बरेच चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आई-वडील होणार असल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले. त्याचबरोबर काही दिवसणपूर्वी दीपिकाने ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या चित्रकरणासदेखील सुरुवात केली. प्रेग्नट असूनदेखील चित्रीकरण करतानाचे दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या मात्र ती स्वतःला आराम देत आहे. त्यामुळे ती सहसा माध्यमांसमोर येणं टाळते. (deepika padukone baby bump)

दीपिका व रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. अशातच आता दीपिकाचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्याबरोबर तिचा पती रणवीर सिंहदेखील दिसून येत आहे.

आणखी वाचा – कौलारु घर, मोठं अंगण अन्…; कोकणात इतकं साधं व सुंदर आहे वनिता खरातचं घर, नवऱ्याने शेअर केले फोटो, म्हणाला, “बायकोचं घर…”

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट गाला २०२४’च्या कार्यक्रमात दीपिका अनुपस्थित राहिलेली दिसून आली. तिच्या अनुपस्थितीने चाहते नाराज झाले आहेत. पण खूप काळ प्रतिक्षा केल्यानंतर चाहत्यांना दीपिकाच्या बेबी बंपची झलक पाहायला मिळाली आहे. दीपिकाच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्या मागेच रणवीर सिंह पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसून येत आहे. त्याचा चेहरा इतका स्पष्ट दिसत नाही आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – मतदानासाठी मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची धडपड, पुणे-अलिबाग-आरवली असा प्रवास अन्…; मिसळवरही मारला ताव, फोटो व्हायरल

दरम्यान आता रणवीरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दीपिका व रणवीरच्या लग्नाचे फोटो डिलिट झालेले दिसून आले आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार काही कारणांमुळे त्याने ते फोटो डिलिट केले नसून काही काळासाठी हाइड केले असल्याचे समजत आहे.  

दीपिका व रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकत्रितपणे दिग्दर्शिक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका लेडी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ,करीना कपूर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसणार आहेत.

Tags: deepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update new promo

अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीने गाणं शिकवणाऱ्या मुलीला दिले पैसे, अक्षरापासून कायमचा दूर होणार का?, नवं वादळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.