शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खुशखबर! बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात, श्रीकांत तिवारी नवीन मिशनवर

Saurabh Moreby Saurabh More
मे 7, 2024 | 6:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Family Man series third season’s shooting started post viral on social media

खुशखबर! बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात, श्रीकांत तिवारी नवीन मिशनवर

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक या सीरिजच्या आगामी सीझन्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले असून तिसरा सीझनही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीरिजचे अनेक प्रेक्षक या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला होता. अशातच आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरता लागून राहिली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनच्या अखेरीस तिसऱ्या सीझनबाबत हिंट देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागली होती.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

अशातच आता या सीरिजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनचे चित्रीकरण सुरू झाले असून सोशल मीडियाद्वारे याबद्दलची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. श्रीकांत तिवारी व जे.के. तळपदे आता पुन्हा नव्या मिशनवर असणार आहे. वेब सीरिजमधील भारतीय तपास यंत्रणेचे हे गुप्तहेर कोणत्या मिशनवर असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा – अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीने गाणं शिकवणाऱ्या मुलीला दिले पैसे, अक्षरापासून कायमचा दूर होणार का?, नवं वादळ

‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीझन संपल्यापासून वेब सीरिजचा फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आता सीझन ३ सध्या प्रोडक्शनमध्ये आहे. २४० देशांमध्ये ही वेब सीरिज लाँच होणार असून या सीझनमध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेतून थिरकण्यासाठी सज्ज झाला आहे.

आणखी वाचा – “भावना महत्त्वाची आणि आपले संस्कार…”, बॉलिवूड अभिनेत्रीच्या पाया पडण्यावरुन कुशल बद्रिकेला नेटकऱ्याचा प्रश्न, उत्तर देत म्हणाला, “प्रश्न वयाचा…”

‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये  वेगवेगळे मुद्दे हाताळण्यात आले होते. पहिल्या भागात काश्मीर, दहशतवादाशी संबंधित मुद्दा होता. तर, दुसऱ्या सीझनमध्ये तामिळनाडू आणि श्रीलंकेतील तामिळ फुटीर चळवळीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये नेमके काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

Tags: ott entertainment newsOTT Marathi NewsOTT Series NewsThe Family Man 3
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
08 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सर्वार्थ सिद्धी योगामुळे मेष व कर्क राशीसह ‘या’ पाच राशींचे भाग्य उजळणार, आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.