शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिक्षा चालवताना रील्स बघणाऱ्या चालकावर भडकली रेश्मा शिंदे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “असा अनुभव…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 28, 2024 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
reshma shinde viral video

रेश्मा शिंदे रिक्षाचालकावर भडकली

‘स्टार प्रवाह’वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे हीने मुख्य भूमिका साकारली आहे. रेश्मा गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलेली बघायला मिळाली. रेश्मा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (reshma shinde viral video)

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रेश्माने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेश्मा एका रिक्षामध्ये बसलेली दिसून येत आहे. तसेच रिक्षा चालवणारा व्यक्ती हा फोनमध्ये रील्स बघताना दिसत आहे. त्यामुळे रेश्मा रागावलेली दिसत आहे. तिने संताप व्यक्त करत लिहिले की, “तुम्हाला असा अनुभव आला आहेका? रिक्षा चालक असेच व्हिडीओ, रील्स बघत रिक्षा चालवतो का?” तसेच खाली हो किंवा नाही असा पोल दिला आहे.

आणखी वाचा – भेट देण्यासाठी, घर सजवण्यासाठीच्या सुंदर वस्तु मिळतील अगदी २०० रुपयांमध्ये, घडयाळ, खुर्च्या आणि बरंच काही

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

दरम्यान आता रेश्माची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या सगळ्यावर प्रेक्षक काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सकाळी सहा वाजता हा व्हिडीओ रेश्माने शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबरच रेश्माचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नाप्रसंगीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा – “जे स्वप्न पाहिलं होतं ते…” रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लग्नाचा खास व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर रेश्मा व पवन यांनी एकमेकांसाठी उखाणादेखील घेतला. या उखाण्याचा व्हिडीओ रेश्माने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. रेश्माने शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये तिच्या लग्नाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे.  रेश्माने पवनसाठी खास उखाणा घेत म्हटलं की, “जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मिळालं… खरं सुख काय असतं हे पवनमुळे कळालं” तर, यानंतर पवननेही आपल्या बायकोसाठी खास इंग्रजीत उखाणा घेतला. “Six Plus Three is Equal to Nine & Reshma is Mine”. पवनच्या या उखाण्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.   

Tags: auto driverreshma shindeviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
ranbir kapoor and alia bhatt daughter video

रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीची अनुष्का-विराटच्या मुलांशी तुलना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ना अहंकार…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.