अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी खूप चर्चेत आहे. मात्र सध्या या दोघांपेक्षा त्यांची मुलगी राहा अधिक चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी रणबीर व आलिया यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आणलं. तेव्हा राहाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राहा ही तिचे आजोबा म्हणजे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचेही म्हंटले. त्यानंतर ती अनेकदा आई,बाबा, आजी यांच्याबरोबर स्पॉट केली गेली. अशातच आता पुन्हा एकदा नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला होता. ख्रिसमसच्या दिवशी राहा पुन्हा एकदा माध्यमांसमोर आली. यावेळी न घाबरता, न लाजता तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना हाय करत फ्लाइंग किस दिले. (ranbir kapoor and alia bhatt daughter video)
राहाचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अशातच राहाच्या अजून एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणबीर व आलिया लेकीबरोबर नवीन वर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी बाहेर जाताना दिसून येत आहेत. यावेळी ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी राहाला आलियाने उचलून घेतले होते. राहाची नजर पापाराझींवर पडताच ती मोठ्याने ओरडून बाय असं म्हणाली आणि फ्लाइंग किसदेखील दिला.
राहाच्या या कृतीने आलियाला खूप हसू येते. तसेच रणबीरदेखील हसू लागतो. दरम्यान हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यावर अनेकांनी पसंती दर्शवली असून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “या दोघांना बघून अनुष्का-विराटची आठवण आली. ते त्यांच्या मुलांना असं लपवतात जसा काही बॉम्ब आहे”. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, मला कोणीही सेलिब्रिटी आवडत नाही किंवा कोणी स्टार आवडत नाही. पण जेव्हा राहाला बघते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आपोआप स्मितहास्य येते. ती खूप गोड आहे”.
आणखी वाचा – रिक्षा चालवताना रील्स बघणाऱ्या चालकावर भडकली रेश्मा शिंदे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “असा अनुभव…”
तसेच अनेक नेटकऱ्यांनी लिहिले की, “कोणताही अहंकार नाही, बडेजावपणा नाही, फक्त प्रेम. ही तर राजकुमारी आहे”. तसेच एकाने लिहिले की, “राज कपूरचा वारसा पुढे नेणार. खूप गोड मुलगी आहे”. दरम्यान यावेळी एअरपोर्टवर नितू सिंह, सोनी राजदान व आलियाची बहीण शाहीनदेखील दिसून आली.