‘स्टार प्रवाह’वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे हीने मुख्य भूमिका साकारली आहे. रेश्मा गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलेली बघायला मिळाली. रेश्मा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (reshma shinde viral video)
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रेश्माने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेश्मा एका रिक्षामध्ये बसलेली दिसून येत आहे. तसेच रिक्षा चालवणारा व्यक्ती हा फोनमध्ये रील्स बघताना दिसत आहे. त्यामुळे रेश्मा रागावलेली दिसत आहे. तिने संताप व्यक्त करत लिहिले की, “तुम्हाला असा अनुभव आला आहेका? रिक्षा चालक असेच व्हिडीओ, रील्स बघत रिक्षा चालवतो का?” तसेच खाली हो किंवा नाही असा पोल दिला आहे.
आणखी वाचा – भेट देण्यासाठी, घर सजवण्यासाठीच्या सुंदर वस्तु मिळतील अगदी २०० रुपयांमध्ये, घडयाळ, खुर्च्या आणि बरंच काही
दरम्यान आता रेश्माची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या सगळ्यावर प्रेक्षक काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सकाळी सहा वाजता हा व्हिडीओ रेश्माने शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबरच रेश्माचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नाप्रसंगीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा – “जे स्वप्न पाहिलं होतं ते…” रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लग्नाचा खास व्हिडीओ व्हायरल
लग्नानंतर रेश्मा व पवन यांनी एकमेकांसाठी उखाणादेखील घेतला. या उखाण्याचा व्हिडीओ रेश्माने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. रेश्माने शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये तिच्या लग्नाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. रेश्माने पवनसाठी खास उखाणा घेत म्हटलं की, “जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मिळालं… खरं सुख काय असतं हे पवनमुळे कळालं” तर, यानंतर पवननेही आपल्या बायकोसाठी खास इंग्रजीत उखाणा घेतला. “Six Plus Three is Equal to Nine & Reshma is Mine”. पवनच्या या उखाण्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.