शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते?’ मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा सोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा काही खास फोटो

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi serial aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar engagement with aakash chowkase photo viral on social media

'आई कुठे काय करते?' मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा सोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा काही खास फोटो

गेले काही दिवस मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन सृष्टीतील मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष व गौतमी-स्वानंद हे कलाकार विवाहबंधनात अडकले. त्याचबरोबर गेल्या महिन्यात छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ फेम मानसी घाटे व ‘रमा राघव’ फेम सोनल पवार यांचेही लग्न पार पडले आहे. अशातच आता ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमधील एक अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला असून लवकरच ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. (Kaumudi Walokar On Instagram)

‘आई कुठे काय करते?’ मधील आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकरने चाहत्यांना वर्षाअखेरीस सुखद धक्का दिला आहे. कौमुदीचा ३१ डिसेंबरला थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे खास क्षण शेअर करून तिने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत “उद्या आपल्या आयुष्याचे पोस्टर उघड होत आहे.” त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी तिने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर केले. “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” असं लिहित कौमुदीने सोशल मीडियावर होणारा नवरा आकाश चौकसेबरोबरचा  खास फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar | कौमुदी वलोकर (@kaumudiwalokar)

आणखी वाचा – Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

कौमुदीच्या साखरपुड्याच्या पोस्टवर अनेक् मराठी कलाकार मंडळींनी कमेंट्सद्वारे तिचे अभिनंदन केले आहे. मालिकेतील मधुराणी प्रभूलकर, अश्विनी महांगडे, कृतिका देव, अक्षया गुरव, नेहा शितोळे, अमृता देशमुख यासंह अभिनेता अभिषेक देशमुख व निपुण धर्माधिकारी यांनी कौमुदी व आकाशला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कौमुदीच्या अनेक् चाहत्यांनीदेखील या पोस्टखाली कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “पूर्ण कपडे न घालता…”, मौनी रॉयचा नवऱ्यासह स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज बाळगा आणि…”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती. तर ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांटुन्न प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tags: aai kuthe kaay karteentertainment newsmarathi entertainmentMarathi newsmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
koffee with karan 8 actress janhavi kapoor accidently took name of rumoured boyfriend shikhar pahariya

सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला जान्हवी कपूर डेट करत असल्याचं खरं ठरलं, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, "शिखूचे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.