शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaumudi walokar wedding

कौमुदी वलोकर अडकली लग्नबंधनात

टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मराठी मालिका ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील आरोही म्हणजेच कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कौमुदीच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली होती. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत या सगळ्या समारंभाची झलक सोशल मीडियावर बघायला मिळाली होती. अशातच आता ही अभिनेत्री थोरा-मोठ्यांच्या साक्षीने लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे काही खास फोटो समोर आले आहेत. लग्नविधीच्या वेशात कौमुदी व आकाश दोघंही खूप सुंदर दिसत आहे. गेल्या वर्षी आकाश व कौमुदीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर एका वर्षातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (kaumudi walokar wedding)

कौमुदी व आकाश यांचा पारंपरिक विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी कौमुदीने चिंतामणी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसेच त्यावर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज व गुलाबी रंगाची शाल घेतली आहे. तसेच सुंदर असे उठावदार दागिनेदेखील परिधान केले आहेत. तसेच आकाशने फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले आहे. तसेच त्यावर मॅचिंग आणि कौमुदीच्या साडीला मॅचिंग शाल घेतली आहे. दोघा नवरा-नवरीचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा फिल्मी स्टाईल संगीत सोहळा, जबरदस्त डान्स, धमाल अन्…; Photo viral

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

समोर आलेल्या फोटोपैकी एका फोटोमध्ये दोघंही आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये आकाश कौमुदीच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघंही सप्तपदी घेताना दिसत आहेत. तसेच यामध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसत असून अजून एका फोटोमध्ये कान पिळण्याची प्रथा दिसून येत आहे. हे फोटो शेयर करत कौमुदीने “साथ सात जन्माची”असे कॅप्शन दिले आहे. कौमुदीच्या या फोटोंवर अनेक कलाकार व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – हेमंत ढोमेच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “नवीन सदस्य लक्ष्मी…”

तिच्या हळदी समारंभाचे व मेहंदी समारंभाचे काही फोटो समोर आले होते. कौमुदीच्या साधेपणाच्या हळदीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच तिच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले होते. यामध्ये कौमुदी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान आता आकाश व कौमुदी लग्नबंधनात अडकले आहेत.

Tags: kaumudi walokarmarathi actresswedding
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
chota pudhari viral video

निक्की ताई व अरबाज दाजींना भेटायला आला छोटा पुढारी, भेट झाल्यानंतर म्हणाला, "कोण आपलं, परकं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.