शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा फिल्मी स्टाईल संगीत सोहळा, जबरदस्त डान्स, धमाल अन्…; Photo viral

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 10:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaumudi walokar sangeet ceremony

कौमुदी वलोकरचा संगीत सोहळा उत्साहात संपन्न

सध्या सर्वत्र लग्नाचे वातावरण आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. ‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील आरोहीची भूमिका सकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिच्या हळदी समारंभाचे व मेहंदी समारंभाचे काही फोटो समोर आले आहेत. कौमुदीच्या साधेपणाच्या हळदीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच आता तिच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये कौमुदी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. तर ही संगीत रात्र तिच्यासाठी खूपच स्पेशल असलेली दिसून येत आहे. कौमुदीच्या संगीत सोहळ्यात नक्की काय काय झालं? हे जाणून घेऊया. (kaumudi walokar sangeet ceremony)

काही दिवसांपूर्वीच कौमुदीच्या लग्नाची बातमी समोर आली. त्यानंतर ‘आई कुठे…’च्या सेटवर तिच्या सहकलाकरांनी तिच्यासाठी खास केळवणदेखील ठेवलं. त्यानंतर तिचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. अशातच आता तिच्या संगीत सोहळ्याचे सुंदर असे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये कौमुदीने सुंदर असा सोनेरी-चंदेरी लेहंगा परिधान केला आहे. तसेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे आकाशनेदेखील साजेशी अशी काळ्या-सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. यामध्ये दोघांचाही खूप सुंदर लूक दिसून येत आहे.

आणखी वाचा -“डोक्यावरचं आभाळ फाटलं, पायाखालची जमीन निसटली अन्…”, वडिलांच्या आठवणीत ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले, “गेली १९ वर्ष सतत…”

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

संगीत सोहळ्यादरम्यान कौमुदी व आकाश डान्स करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. या सोहळ्यामध्ये दोघांच्याही कुटुंबातील सदस्य व मित्र-मंडळी उपस्थित असलेली दिसून आली. दरम्यान कौमुदीच्या सर्व फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असलेली दिसून येत आहे. यावेळी कौमुदीच्या साध्या पण सुंदर मेकअप व छान आशा हेअर स्टाइलने लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – अर्जुन कपूरच्या ‘त्या’ वक्तव्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली मलायका अरोरा, म्हणाली, “माझं खासगी आयुष्य सार्वजनिकरित्या…”

गेल्या वर्षी कौमुदीचा साखरपुडा पार पडला. आता लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच संसार थाटणार आहे. तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.   

Tags: kaumudi walokarkaumudi walokar sangeet ceremonymarathi actress
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
onkar raut viral post

"आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्यास का?", ख्रिसमसच्या फोटोंवरुन मराठी अभिनेत्याला नेटकऱ्याने सुनावलं, भडकून म्हणाला, "ईदलाही माहीमला जातो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.