अभिनेत्री मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांची जोडी अधिक पसंत केली गेली. त्यांच्या जोडीला चाहत्यांचीदेखील खूप पसंती मिळाली आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबद्दलची माहिती स्वतः अर्जुनने त्याच्या चाहत्यांना दिली होती. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठी अर्जुनने हजेरी लावली होती. याचठिकाणी बोलताना अर्जुनने त्याच्या व मलायकाच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केले होते. मनसे च्या कार्यक्रमात अर्जुनने हातात माईक घेताच लोक गर्दीतून मलायकाचं नाव घेतात. हे ऐकून अर्जुन म्हणतो “मी सिंगल आहे”. त्यानंतर त्याने असं म्हटलं की, “माझी ओळख ‘टॉल व हँडसम’ अशी करून दिली. यामुळे त्यांच्या ब्रेक झालेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले होते. (malaika arora on arjun kapoor)
अशातच आता मलायकाने अर्जुनच्या या वक्तव्यावर मौन सोडले आहे. मलायकाने नुकताच इटाइम्सबरोबर संवाद साधला. तिने अर्जुनच्या सिंगल असणाऱ्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. मलायका म्हणाली की, “मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कधीही सार्वजनिक मंचाचा वापर करणार नाही. त्यामुळे अर्जुनने जे काही सांगितलं तो पूर्णत: त्याचा अधिकार आहे”.
पुढे ती म्हणाली की, “२०२४ या वर्षामध्ये माझ्यावर खूप आघात झाले आहेत. येणारे वर्ष हे माझ्यासाठी खूप आनंद घेऊन येईल अशी मी आशा व्यक्त करते. नवीन वर्षात मी आयुष्याची सुरुवात नव्याने करणार आहे”. त्यामुळे मलायका आता पूर्णपणे अर्जुनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अर्जुन सुरुवातीपासून तिच्या बरोबर असलेला दिसून आला. त्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुकदेखील केले. सोशल मीडियावरदेखील याबद्दलच्या अनेक चर्चा रंगलेल्या दिसून आल्या. २०१८ पासून मलायका व अर्जुन यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला त्यांनी नात्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांनी सगळ्यांसमोर नातं स्वीकारलं. दोघंही अनेक ठिकाणी एकत्रितपणे असलेले दिसून यायचे. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळायचे.