बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जावयाने मुलाची कमी भरुन काढली”, गणेशोत्सवासाठी अंकितासह नवराही पोहोचला कोकणात, शब्द पाळला आणि…; व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 27, 2025 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita walawalkar ganesh festival

"जावयाने मुलाची कमी भरुन काढली", गणेशोत्सवासाठी अंकितासह नवराही पोहोचला कोकणात, शब्द पाळला आणि…; व्हिडीओ समोर

ankita walawalkar ganesh festival : सध्या सर्वत्र गणरायाचं आगमन झालं आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. कोकणात तर गणेशोत्सवाची धामधूम निराळीच असल्याचं पाहायला मिळतं. यंदाही कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. आपल्या सर्वांची कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरही लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली आहे. अंकिता तिचा नवरा संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह कोकणात पोहोचली आहे. गणेशोत्सव आणि अंकिता हे समीकरण वेगळंच असलेलं पाहायला मिळालं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात असतानाही अंकिताला गणेशोत्सवाची खूप आठवण आली होती. घरातील मोठी लेक असल्याने गणेशोत्सव असो वा इतर जबाबदाऱ्या अंकिता स्वतः खूप मेहनत घेते. सगळ्यात ती पुढाकार घेताना दिसते. इतकंच नव्हेतर लग्नाआधीही अंकिताने कुणालला काहीही झालं तरी लग्नानंतर गणेशोत्सवाला माहेरी जावे लागेल अशी अट घातली होती. तर कुणालनेही अंकिताला आपण दोघे मिळून सर्व नीट करु असं वचन दिलं. आता सासरची तयारी झाल्यानंतर अंकिता नवऱ्याला घेऊन देवबागला पोहोचली आहे.

आणखी वाचा – ‘KGF’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन, ‘कांतारा’च्या शूटदरम्यान आलेला ब्रेन स्ट्रोक

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

गणेशोत्सवाच्या संपूर्ण तयारीचा व्हिडीओ अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अंकिता म्हणतेय, “सासरच्या गणपती बाप्पाची तयारी करुन मी निघाले माहेरच्या गणपती बाप्पाची तयारी करण्यासाठी. आता सगळ्यांनाच माहित आहे जेव्हा आम्ही लग्नाचं ठरवत होतो तेव्हाच मी कुणालला म्हटलं होतं की, गणपतीचं काय? तेव्हा तो म्हणाला होता मी सुद्धा येईन आपण मिळून सगळ्या गोष्टी करुया. मुंबईहून गावी गेल्यावर आम्ही लगेच सजावट करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी गावच्या मार्केटमध्ये जाऊन मी बाकीचं सामान घेऊन आले”.

आणखी वाचा – नेमकं चुकलं काय?, ‘त्या’ व्हिडीओमुळे अर्थव सुदामे चर्चेत की अडचणीत?, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा माफीनामा

पुढे अंकिता म्हणतेय, “आमचं राहतं घर हे १०० वर्षांपेक्षाही जुनं आहे. पूर्ण मातीचं घर आहे. त्याला बाहेरुन फक्त प्लास्टर केलेलं आहे. त्यामुळे घरात असलेल्या सगळ्या वस्तू या खूप जुन्या आहेत. सजावट पूर्ण झाल्यावर आम्ही गेलो बाप्पाला घरी आणण्यासाठी आणि हो जावयाने मुलाची कमी भरुन काढली हा. पण, खरं सांगू? मुलगी आणि मुलगा असा काहीच फरक नसतो. आपण सेवा कोणाकडून करून घ्यायची हे सुद्धा त्याच्या हातात असतं. त्याची इच्छा. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया”, अशी पोस्ट अंकिताने शेअर केली आहे.

Tags: ankita walawalkarentertainmentganesh festival
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
shefali jariwala old video of ganpati bappa

एका वर्षांपूर्वी शेफाली जरीवालाने केलेलं घरच्या गणेशाचे स्वागत, अचानक निधनाने सगळंच संपलं, नवऱ्याने केली अपूर्ण इच्छा पूर्ण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.