नाटक, मालिका व चित्रपट या सर्वच माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा डंका वाजवणारे सर्वगुणसंपन्न अभिनेते म्हणजे वैभव मांगले. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले वैभव मांगले यांनी सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी नोकरी केली. मात्र जेव्हा ते मुंबईत आले, तेव्हा त्यांनी विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होत आपला अभिनय कौशल्य सर्वांसमोर आणलं. ‘अलबत्या गलबत्या’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’ ही त्यांची नाटकं विशेष गाजली आहेत. तसेच, त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ अभिनयातच नाही, तर गायनामध्येही वैभव यांनी आपल्या आवाजाची झलक दाखवली आहे. (Vaibhav Mangale Throwback Photo)
आपल्या सर्वगुणसंपन्न अभिनयाने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे वैभव मांगले सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते त्यांच्या फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात तर असतात. शिवाय, विविध मुद्द्यांवर परखड मत मांडत असतात. अशातच वैभव यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या चर्चा होत आहे. वैभव यांनी इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो २१ वर्षांपूर्वीचा असून ज्यामध्ये ते एकदम वेगळे दिसत आहे. या फोटोला त्यांनी “वक्त वक्त की बात होती हैं भैया…”, असं हटके कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – “टॉयलेटही नाही, मासिकपाळी आली तर…”, नाट्यगृहांच्या अवस्थेबाबात निवेदिता सराफ यांचा संताप, म्हणाल्या, “तेव्हा मी आवाज चढवला कारण…
त्यांच्या या फोटोला चाहत्यांकडून कमेंटद्वारे प्रेम मिळताना दिसत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “केसांचे वैभव जरी राहिले नाही पण अभिनयाचे मात्र नंदनवन बहरले.”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, “गेलेला काळ, गेलेले लोक आणि गेलेले केस… फिर नही आते, फिर नही आते…” तर एका चाहता वैभव यांची एक जुनी आठवण सांगताना म्हणतात, “हा लूक बघून मला जुने पैसा फंड शाळेतील दिवस आठवले. त्यावेळी मी ८वीत असेन आणि तुम्ही ११ वीला होता. तेव्हा तुम्हाला असे पाहिले होते. तुम्ही त्या वेळेस वर्गात पोहचेपर्यंत गाणी म्हणत असायचा.” एकूणच, वैभव यांचा हा जुना फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – सासूने सोन्याच्या बांगड्या मागताच अमृता खानविलकरने सरळ नाही म्हणून दिलं उत्तर, म्हणालेली, “आठ लाखांची अंगठी मला हवी होती पण…”
वैभव यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक कलाकृतींमध्ये काम केलेलं आहे. शिवाय ‘फु बाई फु’ या कार्यक्रमातही आपला विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आहे. ते सध्या ‘संज्या छाया’ आणि ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांचे प्रयोग करत आहे.