बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूर हे दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. दोघांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण सध्या सैफ व करीनापेक्षाही त्यांच्या मुलांची अधिक चर्चा होत असलेली दिसून येत आहे. दोघांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी जेह व तैमुरला पाहिले जाते. तसेच लहान वयातदेखील माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (saif ali khan son taimur gk video)
सैफ व करीनाची दोन्हीही मुलं माध्यमांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अनेकदा दोघंही फोटोग्राफर्सवर चिडतात तसेच त्यांना उलट उत्तर देतानादेखील पाहिले गेले आहे. त्यामुळे सैफ व करीनाने आपल्या मुलांवर नक्की कसे संस्कार केले आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशातच आता तैमुरचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळे आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
सैफ व करीनाचा आठ वर्षाचा मोठा मुलगा सध्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो ऑनलाइन जनरल नॉलेज क्लासमध्ये सहभागी होता. यामध्ये त्याने अमेरिकन आंतराळ प्रवासी Eugene Cernan यांच्यासंबंधित एक प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे त्याने अचूक उत्तर दिले. यामुळे त्याचे शिक्षकदेखील आश्चर्यचकित झाले. या व्हिडीओमध्ये त्याला सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारला गेला. त्याला विचारण्यात आले की, “चंद्रावर जाण्याआधी Eugene Cernan ने आपल्या मुलीचे नाव काय ठेवले होते?”, त्यावर तैमुरने उत्तर दिले की, “त्यांनी आपल्या मुलीचे नाव टेरेसा डॉन सेर्नन ठेवले होते”.
त्याच्या या व्हायरल व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “मस्त, हा हुशार आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “आमचा गोड रसगुल्ला टीम टीम भारी आहे. आम्हाला अभिमान आहे”. तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “फक्त इंग्लिशमध्येच नाही तर हिंदीमध्येदेखल अभ्यास झाला पाहिजे”.
सैफ व करीना २०१२ साली लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना तैमुर झाला. त्याचे जेव्हा नाव ठेवले तेव्हा देखील अनेक वाद विवाद झाले होते.