शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तेजस्विनी पंडितच्या नवीन चित्रपटाची घोषणा, “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” लिहिलेल्या हिरोची चर्चा, पोस्टरने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi movie Yek Number poster released Produced by actress Tejaswini pandit

तेजस्विनी पंडीत व राजेश म्हापुसकर यांच्या येक नंबर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, उत्सुकता शिगेला

Yek Number Movie : चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटनं हे एकत्र येऊन चित्रपट करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार असल्याच्या चर्चांना तेव्हापासून उधाण आलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोघं एकत्र आल्यावर काय होणार याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याची झळक नुकतीच शेअर करण्यात आली आहे. तेजस्विनी पंडीतने नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. (Yek Number Movie Poster)

सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले असून हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर ‘मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा’ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. तसंच पँटच्या मागच्या खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटलीही आहे. त्याच्या मनातील धगधगणारी आग पोस्टरमधून दिसून येत आहे. प्रेमात वेडा आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नेमका कोण आहे? त्याची गोष्ट काय असेल? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)

आणखी वाचा – Kolkata Rape Case प्रकरणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाला, “जसं राम मंदीर उभारण्यात आलं तसं…”

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. ‘येक नंबर’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर संजय मेमाणे ‘येक नंबर’चे छायाचित्रकार आहेत.

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत शतग्रीवचा राक्षसाचा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, नवीन कथानक पाहून प्रेक्षक नाराज, म्हणाले, “काय बालिशपणा…”

चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी समोर आल्या असल्या तरी यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तसंच पोस्टरमधील नायकाच्या जॅकेटवर लिहिलेल्या ‘मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा’ या वाक्यामुळे हा चित्रपट राज ठाकरे यांच्याशी संबंधित आहे का? हे कोडंही अनेकांना पडलं आहे. दरम्यान, तेजस्विनी पंडीतने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Marathi movie newstejaswini panditYek Number marathi movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 todays elimination suraj chavan yogita chvan abhijeet sawant and nikhil damle nominated

Bigg Boss Marathi मधील 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार, कुणाला मिळणार घरचा आहेर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.