Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की नॉमिनेशन हे साहजिकच आलं. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी तो घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. आता ‘बिग बॉस मराठी ५’ चा तिसरा आठवडा झाला आहे. मागील आठवडयात घरात एलिमिनेशन झाले नव्हतं. मात्र या आठवड्यात घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. त्यात या आठवड्यात फक्त ४ सदस्य नॉमिनेट झाले आहेत, त्यातील सगळ्यात कमी वोट पडलेला सदस्य आज घराबाहेर जाणार आहे. (Bigg Boss Marathi 5 daily updates)
या आठवड्यात योगिता, निखिल, सूरज व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अरबाज व अभिजीत यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाजने निक्कीला आणि अभिजीतने पॅडी कांबळे यांना नॉमिनेशनपासून वाचवले होते. मात्र वैभव त्याला मिळालेल्या पॉवरमध्ये नॉमिनेशनपासून घन:श्यामला वाचवतो आणि त्याच्या याऐवजी अभिजीतला नॉमिनेट करतो. त्यामुळे आता बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत.
तसंच या चौघांपैकी सूरजला संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्याचे वोट्स खूप जास्त आहेत. यामुळे तो यावेळेसही सुरक्षित आहे. तर त्यापाठोपाठ अभिजीतचा गेम दिसल्याने चाहते त्यालाही वोट करत आहेत, या आठवड्यात सुरज आणि अभिजीत यांना सगळ्यात जास्त वोटिंग झाली आहे. मात्र योगिता व निखिल दोघेही बॉटम २ मध्ये आहेत. योगिताने स्वतचं घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या आठवड्यात योगिताने जान्हवी आणि निकी यांच्या नाकात दम आणला. ती एकटी त्या दोघांवरही भारी पडली होती.
त्यामुळे आता या दोघांपैकी योगिताचे वोट जास्त आहेत. मात्र निखिलचा गेम खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर आऊ शकतो असं दिसत आहे. सध्याच्या वोटिंगनुसार निखिलला कमी मत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता योगिता व निखिल यापैकी नेमकं कोण बिग बॉसच्या घराबाहेर जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.