रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तीन ते चार वर्ष आजाराशी झुंज आणि…”, आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”  

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 24, 2023 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Seema Deo Death

सीमा देव यांचे निधन

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमधील सोज्वळ व्यक्तीमत्त्व म्हणून ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. वांद्रे येथील राहत्या घरी सीमा देव यांच्या अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या देव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्यावर्षी सीमा देव यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं. सीमा यांना गंभीर आजाराने घेरलं. या आजारादरम्यानच त्या पूर्ण थकल्या होत्या. आता सीमा यांची मुलं अजिंक्य देव व अभिनय देव यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

कुटुंबात निर्माण झालेली पोकळी आता भरुन निघणार नसल्याची खंत अजिंक्य देवने बोलून दाखवली, अजिंक्य म्हणाला, “आज माझी आई सीमा देव यांचं निधन झालं. सकाळी सात वाजता ती गेली. गेली तीन ते चार वर्ष ती अल्झायमर या आजाराचा सामना करत होती. पूर्ण विस्मृती तिला झाली होती. बाबांना जाऊन आता कुठे दिड वर्ष झालं होतं”.

आणखी वाचा – Seema Deo Passes Away : ५२वर्षे अभिनेत्री सीमा देव यांनी एकच हिऱ्याचे कानातले वापरले कारण…; स्वतः केला होता खुलासा, म्हणालेल्या, “माझ्यासाठी…”

“आईला काही आठवत नव्हतं, कळत नव्हतं पण ती होती. पण आज दोघंही नाहीत. खूप मोठी पोकळी कुटुंबामध्ये निर्माण झाली आहे. निर्माण झालेली पोकळी मी बोलू किंवा सांगू शकत नाही”. अजिंक्य देवने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.  

आणखी वाचा – Seema Deo Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Ajinkya R Deo (@ajinkkyadeo)

सीमा यांचा दुसरा मुलगा अभिनय देव म्हणाला, “मी फक्त एवढंच सांगेन की, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती अल्झायमर या विचित्र आजारामुळे त्रस्त होती. पण खरं सांगायचं झालं तर वयाच्या तेराव्या वर्षापासून माझी आई वेगवेगळ्या रितीने झगडत आलेली आहे. तरीही या सगळ्यामध्ये ती खूप खूश होती. मला माहित असलेली जगातील सर्वात सुंदर महिला कोण तर ती माझी आई होती. एका अर्थाने तिचा त्रास आता कमी झाला आहे. ती आता एका चांगल्या जागी आहे हे मला माहीत आहे”. सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: entertainment newsmarathi actressramesh deoseema deo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Siddharth Chandekar On Seema Chandekar

"तिचं दुसरं लग्न लावून दिलं कारण…", आईचं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "आयुष्यातील एकटेपणा.."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.