शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाईपण भारी देवा’ची वर्षपूर्ती! केदार शिंदेंच्या खास पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “‘सैराट’नंतरचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 4:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kedar Shinde On Baipan Bhari Deva

'बाईपण भारी देवा'ची वर्षपूर्ती! केदार शिंदेंच्या खास पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, "'सैराट’नंतरचा…"

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. सण असल्यासारखा हा सिनेमा समस्त महिलावर्गाने साजरा केला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. केवळ मराठी प्रेक्षकांनी नव्हे, तर हिंदी भाषिक प्रेक्षक, समीक्षक व बॉलीवूड कलाकारांनीही केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाचे प्रचंड कौतुक केलं. (Kedar Shinde On Baipan Bhari Deva)

सहा बहिणींभोवती फिरणारं कथानक या चित्रपटात पाहायला मिळालं. कथानकाबरोबरच चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं पाहायला मिळालं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाल्या. केडर शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत केवळ एका महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवण्याचा विक्रम रचला आहे.

आणखी वाचा – एजे-लीलाच्या रिसेप्शनला खास पाहुण्यांची उपस्थिती, धमाल डान्स करत वाढविली शोभा, पारंपरिक लूकचीही चर्चा

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

हा चित्रपट येऊन वर्ष झालं असून चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त केदार शिंदे यांनी केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत ते म्हणाले आहेत की, “याच दिवशी…मागच्या वर्षी…एक आयुष्यात घटना घडली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या पाठीशी ६ दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने मला खूप काही दिलं. द्रव्य रूपात नाही. पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रीयांच्या मनात एक महत्त्वाची जागा नक्कीच मिळाली. आज वर्ष झालं तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही”.

आणखी वाचा – “राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आणि…”, वडिलांच्या आजारपणाबाबत बोलताना मिताली जगतापला अश्रू अनावर, म्हणाली, “ते कोमात…”

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “‘सैराट’नंतरचा गल्ला या सिनेमाने कमावला. मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते, तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते. जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर जे जे करेन ते ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पाहणार. धुंदीत राहून काम करणार नाही. पुन्हा शुन्यापासून सुरुवात केली आहे. मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे राहतील. स्वामींसारखेच!”.

Tags: baipan bhari devakedar shindeKedar Shinde On Baipan Bhari Devamarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rupali Bhosale New Home

Video : 'आई कुठे…' फेम रुपाली भोसलेचा नव्या घरात गृहप्रवेश, पूजेला टाळ-ढोलकीवर कलाकारांनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.