बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एजे-लीलाच्या रिसेप्शनला खास पाहुण्यांची उपस्थिती, धमाल डान्स करत वाढविली शोभा, पारंपरिक लूकचीही चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Reception

एजे-लीलाच्या रिसेप्शनला खास पाहुण्यांची उपस्थिती, धमाल डान्स करत वाढविली शोभा, पारंपरिक लूकचीही चर्चा

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. अभिराम व लीलाची जोडी प्रेक्षकांना विशेष भावतेय. नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला १००१ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की आता लीला व एजे यांचे नातं रुळावर येईल. पण एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघे ही आजीच्या सांगण्यावरुन एका खोलीत राहायला तयार होतात. (Navri Mile Hitlerla Reception)

एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत अशा दोन व्यक्तींसाठी एका खोलीत राहणे म्हणजे तारेवरची कसरत, अशा या कठीण परिस्थितीत एजे व लीला एकत्र राहू लागतात. एजेला एसी शिवाय जमत नाही आणि लीला बिचारी एसीमध्ये गारठून जाते. तसेच लीलाला अंधाराची भीती आहे तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही, या अशा परिस्थितीत दोघांच्या सुखी संसाराला फक्त सुरुवात झाली आहे. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवसही जवळ आला आहे.

आणखी वाचा – अप्पी-अमोलसाठी अर्जुनचा मोठा निर्णय, त्यांच्याबरोबर राहण्यासही तयार झाला, हा विश्वासघात आर्याला सहन होईल का?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

घाईघाईत आणि अनपेक्षित झालेल्या या लग्नानंतर आता एजे व लीला यांचा रिसेप्शन सोहळा पार पडनार आहे. नुकताच एजे व लीलाच्या रिसेप्शनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, या रिसेप्शनला खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर एजे व लीला यांच्या या खास रिसेप्शनला या कलाकार मंडळींनी खास परफॉर्मन्सही केला आहे.

आणखी वाचा – सत्य समजताच अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला आई म्हणण्यास दिला नकार, पारूलाही सुनावलं अन्…

या सोहळ्याला ‘पारू’ मालिकेतील पारू व आदित्य यांनी पारंपरिक अंदाजात हजेरी लावली, रोमँटिक गाण्यावरही दोघे थिरकले. इतकंच नव्हे तर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा व अधिपती यांनी यावेळी उपस्थिती दर्शिवली आणि स्पेशल डान्स केला. तर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अप्पी व अर्जुन यांचीही एजे व लीलाच्या रिसेप्शनला हजेरी होती. दोघांनी एकत्र एक सुंदर असा परफॉर्म्सनही केला. आणि एजे व लीलाला शुभेच्छा दिल्या.

Tags: Appi Amchi Collectormarathi serialNavri Mile Hitlerla Receptionpaaru serialtula shikwin changlach dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 3, 2026 | 12:10 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Next Post
Mitalee Jagtap emotional Incident

"राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आणि…", वडिलांच्या आजारपणाबाबत बोलताना मिताली जगतापला अश्रू अनावर, म्हणाली, "ते कोमात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.