शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘गुलाबी साडी’वर प्रिया बापट-उमेश कामतचा भन्नाट डान्स, नवरा-बायकोचा पहिल्यांदाच एकत्र डान्स पाहून चाहतेही भारावले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 30, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Bapat And Umesh Kamat On Gulabi Sadi

Video : 'गुलाबी साडी'वर प्रिया बापट-उमेश कामतचा भन्नाट डान्स, नवरा-बायकोचा पहिल्यांदाच एकत्र डान्स पाहून चाहतेही भारावले

सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे गुलाबी साडीची. गुलाबी साडी हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. लहानग्यांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या गाण्याची भुरळ पडली. अनेकजण या गाण्यावर रडताना दिसले. अगदी मराठी कलाकारांनाही या गाण्यावर थिरकतानाचा मोह आवरला नाही. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एक लोप्रिय जोडपं म्हणजेच अभिनेता उमेश कामत व अभिनेत्री प्रिया बापट यांनाही या गाण्यावर थिरकतानाचा मोह आवरला नाही. (Priya Bapat And Umesh Kamat On Gulabi Sadi)

सिनेसृष्टीत प्रिया व उमेश ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच बऱ्यापैकी सक्रिय असते. काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या प्रिया व उमेश नाटकविश्वात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. दोघांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता दोघांनी गुलाबी साडी या गाण्यावर केलेला डान्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “तुला परफॉर्म करताना पाहिलं तेव्हा…”, ‘चंद्रा’ गाणं घडवणाऱ्या आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, अमृता खानविलकर म्हणाली, “मेहनत…”

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

गुलाबी साडी या गाण्यावर जरी प्रिया व उमेश थिरकले असले तरी या गणयवर थिरकण्यासाठी एक खास कारण असल्याचं समोर आलं आहे. प्रिया-उमेशच्या सध्या सुरु असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून लवकरच याचा शंभरावा प्रयोग पार पडणार आहे. “येत्या ७ एप्रिलला आमच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग असल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे” असं कॅप्शन देत प्रियाने हा डान्स केला आहे. यावेळी दोघांनी गुलाबी रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते.

आणखी वाचा – IPL 2024 : हार्दिक पांड्याला सोनू सूदचा फुल्ल सपोर्ट, क्रिकेटरची बाजू घेत पोस्ट शेअर करत म्हणाला, “आधी तुम्ही जयजयकार करता नंतर…”

प्रिया व उमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नव्हेतर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही दोघांच्या सुंदर अशा डान्सच कौतुक केलं आहे. प्रिया-उमेशचा हा गुलाबी साडी गाण्यासाठीचा लूक आणि त्यांचा डान्स लक्षवेधी ठरत आहे.

Tags: gulabi sadipriya bapat and umesh kamatPriya Bapat And Umesh Kamat On Gulabi Sadi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Randeep Hooda recounted a terrifying experience during the shooting of the film Swatantryaveer Savarkar

"मला एक सावली दिसायची आणि…", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या सेटवर रणदीप हुड्डाला दिसायचं काही भलतंच, भयावह अनुभव सांगत म्हणाला, "श्वास कोंडला तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.