रंगभूमी म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो भाला मोठा झगमगणारा मंच, आणि त्या मंचावर काही साहित्य घेऊन उभारलेला हुबेहूब त्या नाटकाचा सेट, नाटक सुरु होण्यापूर्वी गायलेली नांदी, संगीताचा मध्यम आवाज आणि नाटकाची तिसरी घंटा हे सगळं वातावरण डोळे सुखावणार असतं. नाटकं अनेक प्रकारची असतात. मागील काही काळापासून नाटकांमध्ये प्रकार सुद्धा येऊ लागले आहेत. यात पारंपरिक, सामाजिक, ऐतिहासिक, मनोरंजनपर, रहस्यमय या प्रकारांचा समावेश होतो.(World Theatre Day)
कोणत्याही एका देशात मुख्यतः नाटकातले कलाकार ते साकारत असलेल्या पात्रात जीव ओतून ते नाटक त्या रंगभूमीवर रुजवात असतात. काही कलाकार रंगभूमीच्या प्रेमात असल्यामुळे त्याच रंगभूमीशी अतूट नातं जुळलेलं असतं. आज जागतिक रंगभूमी दिवस आहे या निमित्ताने काही मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा(World Theatre Day)
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरातून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. प्राजक्ताने नुकताच तिचा रंगभूमीवरील एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या शाळेतील असून या फोटोमध्ये ती चाणक्याच्या भूमिकेत दिसत आहे. चाणक्य की प्रतिज्ञा या नाटकतात तिने साकारलेल्या चाणक्य या भूमिकेसाठी तिला लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिने प्रथम क्रमांक पटकवला होता. या पोस्टवर प्राजक्ताने आज जागतिक रंगभूमी दिन.. याच निमित्ताने शाळेत असताना “चाणक्य की प्रतिज्ञा” हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक.. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका.. सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून प्रथम क्रमांक पटकावला.. असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

याचबरोबर पर्ना पेठे हिने सुद्धा इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये पर्ना सोबत चारचौघी या नाटकातील सर्व कलाकार नाटकासाठी अगदी उत्साहाने तयार होताना दिसत आहेत. या पोस्टला पर्ना ने सध्या आम्ही जवळपास दररोज प्रयोग करतो, म्हणजे जवळपास दररोजच स्टेजवर असतो, एकत्र नविन गोष्टी शोधायला, अनुभवायला मजा येते, जागतिक रंगभूमी दिनाच्या सदिच्छा टीम चारचौघी लवकरच शंभरावा प्रयोग! असे कॅप्शन दिले आहे.(World Theatre Day)
हे देखील वाचा- नारळ वाढवताना बूट न काढल्यामुळे संकर्षण ट्रोल पण सामंजस्याने दिलं ट्रॉलिंगला उत्तर

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सुद्धा आज जागतिक रंगभूमी निमित्ताने एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्ट मध्ये निवेदितांनी त्यांच्या काही नाटकांचे काही फोटोज शेअर केले आहेत. या पोस्ट ला त्यांनी जागतिक रंगभूमी दिवस 21 नोव्हेंबर 2021 रोजी दीनानाथमध्ये मी माझ्या आयुष्यात पहिल नाटक वाडा चिरेबंदी हा पाहिलं मी स्वरा आणि ते दोघं हे नाटक मी १२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिलं. दोन्ही नाटकांची कथा पूर्णपणे विरुद्ध आहे. पण दोन्ही नाटकांमध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे निवेदिता सराफ. ज्या स्त्रीची मी खूप प्रशंसा करते. ती प्रत्येक गोष्टीत माझी आदर्श आहे. आणि हे दोन नाटक नेहमी माझ्या हृदयाच्या खूप जवळ असतील. म्हणून जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हा फोटो शेअर करत आहे.

याचबरोबर मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकं गाजवणारा कलाकार उमेश कामत याने सुद्धा आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त त्याच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.