रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लाइमलाइटमध्ये टिकून राहण्यासाठी…”, प्रियदर्शन जाधवचे इंडस्ट्रीतील यशाबाबत भाष्य, म्हणाला, “पर्याय नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2025 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Priyadarshan Jadhav on limelight

"लाइमलाइटमध्ये टिकून राहण्यासाठी…", प्रियदर्शन जाधवचे इंडस्ट्रीतील यशाबाबत भाष्य, म्हणाला, "पर्याय नाही…"

Priyadarshan Jadhav on limelight : कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचा लाइमलाईटचा प्रवास आपसूकच डोळ्यासमोर येतो. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी प्रसिद्धीझोतात येण्यासाठी नेहमीच काही ना काही प्रयत्न करतात. अर्थात कलाकार मंडळी म्हटलं की, त्यांचा अथक प्रवास, मेहनत ही आलीच. प्रचंड मेहनतीनंतर ही कलाकार मंडळी त्यांच्या यशाच्या शिखरावर पोहोचतात. हो. पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नाही. या कलाकारांच्या प्रसिध्दीझोताबाबत नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्याने भाष्य केलं आहे. हा अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शनने प्रसिद्धीझोतात येण्याचं स्वप्न बाळगणं हे चुकीचं नसल्याचं म्हणत यावर भाष्य केलं आहे.

नुकतीच प्रियदर्शनने आरपार या युट्युब चॅनेलला मुलखात दिली. यावेळी बोलताना त्याला, “जेव्हा सतत तुम्ही लाइमलाइटमध्ये असता, तेव्हा त्याची तुम्हाला भीती वाटायला लागते का?”, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर प्रियदर्शन म्हणाला, “तुम्ही काही चुकीचं केलं नाही, तर भीती वाटण्याचं काही कारण नाही. लाइमलाइट उत्तम पद्धतीने स्वीकारता आलं पाहिजे. ते नीट टिकवता आलं पाहिजे. अर्थाचा अनर्थ होईल की काय, ट्रोल होऊ की काय ही भीती लाइमलाइटमध्ये आल्यानंतर असते. त्याबरोबरच सध्या आपल्याकडे ही प्रसिद्धी आहे, पण, ती पुढे कायम राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे हे आपल्या हातातून निघून जाईल की काय, अशी एक भीती असते; पण ट्रॅपमध्ये अडकू नये, या मताचा मी आहे.

आणखी वाचा – “तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते…”, सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला, “जाणून बुजून…”

“आता जर लाइमलाइटमध्ये आहात, तर त्याचा आनंद घ्या आणि उद्या जर तुम्ही लाइमलाइटमध्ये नसाल. दुसरं कोणीतरी असेल, तर ते तुम्हाला छान पद्धतीनं स्वीकारता आलं पाहिजे. कोणाला तरी लाइमलाइटकडे पळायचं असतं आणि कोणाला तरी कलेत प्राविण्य मिळवायचं असतं. त्यामध्ये उत्तम काम करायचं असतं. तर कोणाला कुठे जायचं आहे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण, लाइमलाइट ही खूप मस्त गोष्ट आहे आणि मी तिचा खूप आनंद घेतो. सगळ्यांना लाइमलाइटमध्ये राहायला आवडतं आणि फार कमी लोकांना ते मिळतं. तुम्ही जर स्मार्ट असाल, तर लाइमलाइट टिकवता येईल. या क्षेत्रात राहण्यासाठी ते थोडंफार करावं लागतं”.

आणखी वाचा – …म्हणूनच शेफाली जरीवालाच्या निधनादिवशी कुत्र्याला घेऊन फिरत होता पराग त्यागी, त्याला मोठा धक्का बसला अन्…

“माझा एक मित्र आहे. मी त्याचं नाव घेणार नाही. तो लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाटेल ते करतो. वाटेल ते म्हणजे ऊठसूट काहीतरी घाणेरडं करतो, असं नाही. लाइमलाइटमध्ये टिकून राहण्यासाठी विविध दृष्टिकोनातून स्वतःच्या करिअरकडे बघतो. तो त्याचा पुरेपूर वापर करुन घेतो. मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. भासवलं असं जातं की, हा किती स्वतःचा मोठेपणा सांगतोय. स्वतःचं किती कौतुक सांगत आहे, असं त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यावर लोक बोलतात. पण मला वाटतं की, तो प्रोफेशनचा भाग आहे. प्रियदर्शन पुढे असेही म्हणाला की, यशाबरोबर अनेक गोष्टी येतात. आव्हानं, अडचणी, जबाबदारी यांसह काही नकारात्मक गोष्टीही यशाबरोबर येतात. तर ती बॅग घेऊन तुम्हाला चालावं लागतं. ती बॅग सुटली की, यश सुटतं. तुम्हाला तुमच्या खांद्यावर ते घ्यावंचं लागणार, त्याला पर्याय नाही”.

Tags: entertainmentmarathi actorPriyadarshan Jadhav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Paresh Rawal Slams Web Series Content

"सीरिजमध्ये शिव्या असायच्या वा इंटिमेट सीन असायचे", ओटीटी कंटेंटवर भडकले परेश रावल, म्हणाले, "लोक पाहून थकली पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.