बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते…”, सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला, “जाणून बुजून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bhushan Patil On Sachin Pilgaonkar

"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते…", सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला, "जाणून बुजून…"

Bhushan Patil On Sachin Pilgaonkar : सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. चांगलं-वाईट काहीही असलं तरी नेटकरी ट्रोलिंग करणं काही थांबवत नाहीत. दरम्यान, हे प्रमाण आता प्रचंड वाढलं आहे. विशेषतः कलाकार, नेतेमंडळी यांच्या वाटेला हा ट्रोलिंगचा मुद्दा अधिक येतो. बहुतेक अशी कलाकार मंडळी आहेत जी नेहमीच ट्रोलिंगची शिकार होतात. बरेचदा या ट्रोलिंगकडे ही कलाकार मंडळी दुर्लक्ष करतात तर काहीवेळा सडेतोडपणे ही कलाकार मंडळी केलेल्या ट्रोलिंगला उत्तर देतात. दरम्यान, मनोरंजन विश्वात बरेच दिवसांपासून अभिनेते सचिन पिळगांवकर ट्रोल होताना दिसले आहेत.

बऱ्याच दिवसांपासून सचिन पिळगांवकर यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. त्यांना त्यावरुन ट्रोल केलं जातं आहे. शिवाय सचिन यांचे मिम्सही व्हायरल होत आहेत. अशातच आता कलाकारांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना मराठी अभिनेत्यानं चपराक दिली आहे. मराठी अभिनेता भूषण पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं”, राज ठाकरेंच्या वक्तव्याची चर्चा, थेट सरकारला सवाल, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Bhushan Nanasaheb Patil (@thebhushanpatil)

भूषण पाटीलने पोस्ट शेअर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं की, “आजकाल एक नवीन ट्रेंड चालला आहे. मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा. हल्लीच सचिन पिळगांवकर सरांच्या मुलाखतींचे काही कमेंट्स किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं. आणि आणखीन इतर कलाकार. मला माहित नाहीये, हे कोण करतंय, हे जाणून बुजून केलं जातंय, पण मला ह्या ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत सांगायचंय. तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना, तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय. त्यामुळे इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. तुमच्या भल्याचं सांगतोय”.

आणखी वाचा – “हा कोणता माज?”, मराठी भाषा न बोलणाऱ्यांविरोधात अक्षय केळकरचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाला, “किमान कर्मभूमीबद्दल…”

या व्हिडीओची पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शन देत असं म्हटलं की, “स्वतःच्या भाषेचा आणि कलाकारांचा आदर करायला शिका”. अभिनेत्याने ही पोस्ट सचिन पिळगांवकर यांना टॅगदेखील केलेली पाहायला मिळत आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Paras Chhabra On Parag Tyagi Viral Video

...म्हणूनच शेफाली जरीवालाच्या निधनादिवशी कुत्र्याला घेऊन फिरत होता पराग त्यागी, त्याला मोठा धक्का बसला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.