शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सीरिजमध्ये शिव्या असायच्या वा इंटिमेट सीन असायचे”, ओटीटी कंटेंटवर भडकले परेश रावल, म्हणाले, “लोक पाहून थकली पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 6, 2025 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paresh Rawal Slams Web Series Content

"सीरिजमध्ये शिव्या असायच्या वा इंटिमेट सीन असायचे", ओटीटी कंटेंटवर भडकले परेश रावल, म्हणाले, "लोक पाहून थकली पण…"

Paresh Rawal Slams Web Series Content : परेश रावल ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणार नसल्याच्या चर्चां सुरु होताच साऱ्या प्रेक्षकांना धक्का बसला. मात्र अखेर परेश रावल हे प्रेक्षकांना हसवायला पुन्हा येत असल्याचं सांगत त्यांनी सुखद धक्का दिला. अखेर परेश रावल ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणार आहेत या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. अक्षय कुमारच्या या विनोदी चित्रपटात तो पुन्हा एकदा बाबू भैय्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी, अलीकडेच अनुभवी अभिनेत्याने वेब सीरिज या प्लॅटफॉर्मवर भाष्य केलं आहे. काही वेब सीरिजमध्ये चित्रित केल्या जाणाऱ्या इंटिमेट सीन आणि शिव्या, अपशब्दांवर परेश रावल व्यक्त होताना दिसले.

‘बॉलिवूड बबल’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंटेंटला संस्कारी कसे बनवू शकतो या प्रश्नावर परेश रावल यांनी भाष्य केलं आहे. परेश यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं की, “मी तुम्हाला एक विनोद सांगतो, पोलिस स्टेशनमध्ये एक महिला तक्रार नोंदवायला येते. ती सांगते की, समोरच्या इमारतीमध्ये एक व्यक्त नग्न फिरत आहे. पोलिस त्या महिलेच्या घरी येऊन तापसतात आणि खिडकीतून समोर पाहत म्हणतात, “कुठे आहे ती व्यक्ती. आम्हाला तर दिसत नाही आहे”. यावर ती महिला म्हणते, “अहो, स्टूलवर उभं राहून पहा नक्की दिसेल”.

आणखी वाचा – “तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते…”, सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला, “जाणून बुजून…”

परेश रावल पुढे म्हणाले, “जिथे तुम्हाला नग्न, घाण बघायची आहे, मग तुम्हाला ते मिळेल तसे आणि स्टूलवर चढून तुम्हाला ते मिळेल. आपण पाहू नका. जे समाजात आहे, जी सामग्री येते ती म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. आपण प्रस्तावाची भावना, आपली विवेक बुद्धिमत्ता, न्यायालयीन वापरली पाहिजे. लक्ष केंदित करायला असा घाणेरडा कंटेंट वापरतात. समाजात जे घडते ते सर्व काही दर्शविण्यासारखे नाही, ते आरामदायक देखील असू शकते”.

आणखी वाचा – “तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते…”, सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला, “जाणून बुजून…”

‘हेरा फेरी ३’ फेम परेश रावल म्हणाले, “मी म्हणतो की लोक खूप कंटाळले होते की प्रत्येक तिसर्‍या मालिकेमध्ये अत्याचार, लैंगिक देखावे येत असत. ते निरर्थक पद्धतीने येत असत, यामागे काहीही कारण नव्हते म्हणून लोकांना वाटले की यामुळे, लोक आकर्षित होतात, लोकांमुळे हे टीआरपी आहेत. शेवटी लोक थकले परंतु निर्माते असा कन्टेन्ट बनवून काही थकले नाहीत शेवटी सरकारला हा कन्टेन्ट काढून टाकावा लागला”.

Tags: bollywood actorentertainmentparesh rawal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Munawar Faruqui second marriage

स्वतःसाठी नव्हे तर लेकासाठी मुन्नवर फारुकीने केलं दुसरं लग्न, पहिल्यांदाच म्हणाला, “त्याला एकट्याला न सोडता...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.