Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस’चे घर आणि घरातील भांडणं हे समीकरण काही जुने नाही. घरात प्रत्येक दिवशी स्पर्धकांमध्ये काहीना काही कारणावरुन भांडणं आणि वाद हे होतच असतात. गेल्या आठवड्यात वर्षा-निक्की व आर्या-जान्हवी यांच्यात झालेले राडे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही १५ सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Paddy and Ghanshyam fight)
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील दुसऱ्या आठवड्यात जान्हवी व सूरज भांडताना दिसून आले. प्रोमोमध्ये जान्हवी सूरजला “तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही” असं म्हणाली. सूरज पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. अशातच ‘बिग बॉस’मध्ये पॅडी व घन:श्याम यांच्यातही भांडण होत असल्याचे पाहायला मिळणार आहे.
पॅडी घन:श्यामला असं म्हणतात की, “तुला लाज नाही वाटत?, ‘बिग बॉस’ आपल्याविरुद्ध बोलत आहेत. यावर घन:श्याम पॅडीला असं म्हणतो की, “मला कशाची लाज वाटणार. ‘बिग बॉस’ बोलले त्यावरुन हे सिद्ध होते की, मी झोपलो नव्हतो”. यानंतर तो रागात “माझी लाज काढू नका” असंही म्हणतो. त्यावर पॅडी पुन्हा एकदा असं म्हणतात की, “बिग बॉस आपल्याला सुनावत आहेत आणि तू त्यांच्यासमोर हातावर थाप मारत आहेस”. यावर घन:श्याम पॅडीला “ठिक आहे सॉरी. पण तुम्ही लाज काढू नका” असं म्हणतो.
पुढे पॅडी घन:श्याम “तुला काहीतरी वाटलं पाहिजे” असं म्हणतात. तसंच ते “येडया येडया” असं ही चिडवतात. यानंतर ‘बिग बॉस’ घन:श्यामला असं म्हणतात की, “आपण जरी झोपला नसलात तरी कोण झोपलं आहे. याच्याकडे आपले डोळे उघडे पाहिजे” त्यानंतर घन:श्याम पॅडीला पुन्हा “याआधी एखाद्याची लाज काढण्याआधी ध्यान्यात ठेवा” असं रागात म्हणतो.