रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटामधील विशाख सुभेदारच्या लूकचं होत आहे कौतुक, नेटकरी म्हणाले, “एकदम कडक”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 19, 2023 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vishakha subhedar new dashing look

vishakha subhedar new dashing look

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर विविध पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या त्या ‘शुभविवाह’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहेत. अशातच आता विशाखा यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. लवकरच त्यांचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. (vishakha subhedar new dashing look)

सध्या विशाखा यांच्या या चित्रपटातील बेधडक आणि डॅशिंग लूक समोर आला आहे. त्यांनी इन्साग्रामवर या लूकचा फोटो शेअर केला. त्यांच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये त्या हातात गन घेतलेल्या आणि विशिष्ट वेशभूषा दिसत आहेत. हे पाहता विशाखा एखाद्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा म्हटलं जात आहे. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी चित्रपटासाठी असून यात त्यांनी ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली आहे. त्यांचा हा ‘डॅशिंग रावडी लूक’  नेटकऱ्यांनाच्याही बराच पसंतीस पडताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने तर, ‘डॉन वाटते आहेस ताई’ असं म्हणत कमेंट केली आहे. तर बरेच नेटकरी खतरनाक अंदाज म्हणत कमेंट करत विशाखा यांचं कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – “एक शक्ती आहे जी…”, परफॉर्म, चित्रीकरण करताना श्रेया बुगडेला जाणवते दैवी शक्ती, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “दुर्गादेवीचा चेहरा…”

या भूमिकेबद्दल बोलताना विशाखा म्हणाल्या, “ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ‘ग्रे शेड’ भूमिका साकारताना मला मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागलं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये मला अडकून पडायचं नव्हतं. त्यामुळे मी ही वेगळी भूमिका स्वीकारली आहे”. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांनी केली आहे. तर सहनिर्मिता अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. 

आणखी वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…

या चित्रपटात विशाखा सुभेदार यांच्याबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर,  राजेंद्र शिसातकर,  नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,  रोहित माने, सुशील इनामदार यांच्यासही इतरही कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय भूमिकेत पदार्पण करणार आहेत.

Tags: ekda yeun tr baghmarathi actressmarathi movienew dashing lookvishakha subhedar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Ankita Lokhande On Baby Planning

"या शोमध्ये आली नसती तर…", अंकिता लोखंडेने केला बेबी प्लॅनिंगबाबत खुलासा, म्हणाली, "विकीमुळे मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.