बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एक शक्ती आहे जी…”, परफॉर्म, चित्रीकरण करताना श्रेया बुगडेला जाणवते दैवी शक्ती, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “दुर्गादेवीचा चेहरा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 21, 2023 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreya bugde share her experience related durga power

Shreya bugde share her experience related durga power

भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे विविध सण उत्सव मोठा उत्साहात साजरे केले जातात. आता कुठे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आणि दुसरीकडे दुर्गामाताचं आगमनही झालं आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. देवीची अशी विविध रुप आहेत. कधी ती आई बनून आपला सांभाळ करते तर कधी ती मैत्रीण बनून आपल्या सोबत उभी राहते. तर कधी दुर्गा ही शक्ती रुपात आपल्या सोबत असते. अभिनेत्री श्रेया बुगडेच्या आयुष्यात दुर्गाचं महत्त्व काय आहे हे नुकतंच तिने ‘झी मराठी दसरा स्पेशल’ कार्यक्रमात ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. (Shreya bugde share her experience related durga power)

श्रेयाने आजपर्यंत ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच भरभरून  मनोरंजन केलं आहे. पण या कार्यक्रमात आपल्याला बरेच पुरुष पाहायला मिळतात. सेटवर पाच पुरुष आणि दोनच स्त्रीया आहेत या अनुषंगाने तिला प्रश्न विचारण्यात आला. असं कधी झालं आहे का की श्रेयाला कधी तिच्यातली दुर्गा दाखवावी लागली?

आणखी वाचा – Video : “माझी मुलं, पत्नीला व कुटुंबावर जाऊ नका यार”, पोर्नोग्राफी प्रकरणावर बोलताना रडू लागला राज कुंद्रा

त्यावर उत्तर देताना श्रेया म्हणाली, “मला असं वाटतं जेव्हा मी परफॉर्म करते तेव्हा नेहमी मला माझ्यामध्ये विलक्षण शक्तीची प्रचिती होते. मला असं वाटतं की एक काहीतरी शक्ती आहे जी इतकी प्रखर आहे की ती कधीच दिसत नाही, कधी ऐकू येत नाही पण ती आहे. जेव्हा जेव्हा मी मेकअप करून, कपडे घालून तयार होते आणि स्टेजवर जाते तेव्हा मला ती शक्ती नेहमी जाणवते. माझी कुलदैवताही शांतादुर्गा आहे. माझ्या पाठीवर दुर्गादेवीचा चेहरा असलेला टॅटू आहे. यासगळ्या गोष्टी याभोवती आहेतच पण त्यामुळेच कदाचित ती मला शक्ती नेहमी जाणवत असते. तशी खरं तर मला कधी कोणासमोर अवतार घेऊन यायची गरज लागलेली नाही”.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth???? (@shreyabugde)

आणखी वाचा – राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीरची ऋषी कपूर यांच्याशी तुलना, नेमकं काय घडलं?

श्रेया पुढे सांगते की, “सेटवरचे हे जे पाच पुरुष आमच्याबरोबर आहेत. त्यांनी नेहमीच आमची साथ दिली आहे. ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आपण नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मी नेहमीच असं गंमतीने म्हणते या यशस्वी स्त्रीच्या मागे पाच पुरुषांचा हात आहे”, असं सांगत तिने आपल्या यशाचं श्रेय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या पाच पुरुषांना दिलं.

Tags: chala hawa yeu dyadaily shoot lifedurga powermarathi actressshreya bugde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Mugdha Vaishampayan On Marriage Age

"माझं लवकर लग्न होत आहे म्हणून…", योग्य वयात लग्न होण्याबाबत प्रथमेशने मुग्धाला विचारला प्रश्न, म्हणाली, "ती गोष्ट पटत नाही कारण.. "

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.