शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुबईवरुन भाऊ येताच माहेरपणाच्या आठवणीत रमल्या विशाखा सुभेदार, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 5, 2024 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Vishakha Subhedar expressed her feelings by sharing a special social media post on the occasion of Bhaubeej

भाऊबीजनिमित्त मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची खास पोस्ट, भावुक होत म्हणाल्या...

प्रत्येक स्त्रीला माहेरची नितांत ओढ असते. तिच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे माहेरच्या मातीत गेलेली असतात. आई-वडील, भावंडे, माहेरची माणसं, गाव, माती निसर्ग यांबद्दल अनामिक आकर्षक तिला असते. त्यामुळे सणावारानिमित्त अनेक माहेरवाशीनी माहेरी जातात. दिवाळीच्या सणानिमित्त अनेक मराठी अभिनेत्रीही माहेरी गेल्या आहेत. अशा काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार यंदाच्या दिवाळीसाठी आपल्या माहेरी गेल्या असून त्यांनी अनेक वर्षांनी भावाबरोबर भाऊबीज साजरी केली आणि यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. विशाखा यांनी भावाबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या काही भावनाही शेअर केल्या आहेत. (Vishakha Subhedar Bhaubeej Post)

या पोस्टमध्ये विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “अनेक वर्षांनी आमची भाऊबीज साजरी झाली. दादा दिवाळीला दुबईला असायचा कारण सर्व्हिस. यावर्षी मात्र सुट्टी होती आणि आमची भाऊबीज साजरी झाली. अचानक दोघांचे रंग जुळले. ट्युनिंग का काय म्हणतात तसं झाल. खऱ्या अर्थाने माहेरपण उपभोगलं. पूर्वी लांबच्या गावात मुलगी दिलेली असायची.. मुलगी माहेरपणाला आली की महिनाभर रहायची. पण ते सुख जवळ लग्न होणाऱ्या पोरींच्या नशिबी फार कमी येतं. आमचं माहेरपण म्हणजे ७-८ तासाचं. फार-फार तर चार दिवस. अर्थात सासूबाई मागे लागायच्या, नवरा चल म्हणायचा असं काहीच नसायचं. पण आम्हालाच करमायचं नाही. आपण कधी एकदा आपल्या घरी जात आहोत असं वाटायचं”.

आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”  

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “खरच असं खूपदा वाटतं सुट्ट्या काढून माहेरी जाता यायला पाहीजे. (आम्ही जायचो लहानपणी असे आई आणि मावशीबरोबर) आपल्या भाच्याबरोबर दुपारी झाडाखाली पत्ते कुटता यायला पाहिजे. सुट्टीत आलेल्या बहीणींच्या उवा काढता आल्या पाहिजेत. भाचरांचे पाढे पाठ करून घेता आले पाहिजेत. चिंचा फोडता आल्या पाहिजेत. झोके घेता आले पाहिजेत. भांडी घासता घासता, आयुष्य बोलता बोलता डोळ्यांत पाणी यायला हवं आणि पुसायला बहिणीचा आईचा पदर असायला हवा. हे सगळं माहेरपण आमच्या आया-मावशींनी अनुभवलं. आम्हा बच्चे कंपनीचे लाड करता करता सकाळी गरम चहा चपाती, दुपारी गरम त्यांच्या आयांच्या हाताचं मटण, चिल्लसखेळ, बांगड्यांमचे खेळ आणि पोतपोत गहू निवडून देऊन आईचं काम कमी करणं हे सगळे दुपारचे उद्योग आणि रात्री अंगणात भावडांबरोबर गप्पा आणि मग जायची वेळ यायची”.

आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल

यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं की, “सगळी मज्जा झाली की, आम्ही रडत कढत गाड्या पकडायचो. काय गंमत होती. पूर्वीच्या शेणाने सारवलेल्या माहेराची. आज माहेरची ओढ कायम आहे पण वेळ कमी आहे. धावपळीचं आयुष्य… प्रेम आहेच ते असणारच… पण गोंजारायला वेळ नाही… फक्त धावपळ… पण जवळ असल्याने कधीही पाच मिनिटासाठी का होईना आईकडे डोकावत येतं. हेही तितकच खरं. मज्जा असते सणवारी, पण सुट्टी मिळाली तरच मज्जा आहे. थोडं विषयांतर झालं पण मनात आल ते लिहित गेले”. दरम्यान विशाखा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Tags: marathi actressvishakha subhedarVishakha Subhedar Bhaubeej Post
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter

मुलांबरोबरच अधिकाधिक वेळ घालवतो विराट कोहली, अनुष्का शर्माने दाखवली झलक, मुलांनाही वडिलांचाच लळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.