बॉलिवूडमध्ये ‘किंग खान’ म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे शाहरुख खान. नुकताच त्याने साठव्या वर्षात पदार्पण केले. अभिनेता शाहरुख खान हा अभिनेता त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातोच, मात्र तो त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीसुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे. शाहरुखकडे ७००० कोटींहून अधिक संपत्तीसह, भव्य घरांपासून लक्झरी कारपर्यंत सर्वोत्कृष्ट चैनीच्या वस्तू आहेत. अशातच आता त्याने आपल्या लेकासाठी एक नवीन महाग अलिशान कार खरेदी केली आहे. शाहरुखने त्याचा सर्वात धाकटा मुलगा अबरामसाठी नवीन महाग आलिशान कार खरेदी केली आहे. शाहरुखने अबरामसाठी घेतलेली ही गाडी भारतातील सर्वात महाग एमपीव्ही कार आहे. (Shah Rukh Khan Bought Car For Abram)
शाहरुख खानच्या नवीन गाडीची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. शाहरुखच्या या महागड्या गाडीची निवड त्याच्या लक्झरी गाड्यांबद्दलचं प्रेम दर्शवतं. यापूर्वी ही गाडी रणबीर कपूर व जान्हवी कपूर यांनी खरेदी केली होती. शाहरुख खानच्या कारचं कलेक्शन ३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यात जगातील काही प्रसिद्ध वाहनांचा समावेश आहे. शाहरुखच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये बुगाटी वेरॉन, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू, ऑडी ए6 आणि रोल्स रॉयस, फँटम कूपर सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.
आणखी वाचा – “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”
शाहरुखकडे असलेल्या सर्वात महागड्या कारपैकी एक म्हणजे रोल्स-रॉइस कलिनन, जी जगभरात अतिशय महाग आणि अलिशान कार मानली जाते. शाहरुखच्या तिन्ही मुलांकडे अतिशय महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याची मुलगी सुहाना खान व मुलगा आर्यन खान यांच्याकडे मोठ्या कंपनीच्या अलिशान गाड्या आहेत. शाहरुखची तिन्ही मुलंही या चैनीचा आनंद घेतात. शाहरुख खानबरोबर त्याची तिन्ही मुलं काहीना काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात.
आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”
शाहरुख खानचा छोटा अबराम खान नेहमीच त्याच्या गोंडस शैलीने व त्याच्यावरील संस्काराने साऱ्यांची मनं जिंकत असतो. अशातक त्याच्या या नवीन गाडीतील राईडने त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने नुकताच ‘डंकी’, ‘पठाण’सारखे अनेक चित्रपट दिले असून त्याच्या आगामी चित्रपटांची आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.