Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या येण्याने अधिक चर्चेत आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर अनुष्काने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. २०१७ साली ती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नबंधनात अडकली. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. घरातील व मित्रमंडळींपैकी मोजक्याच व्यक्ती या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर अनुष्का व विराटने दोन मुलांना जन्म दिला. सध्या दोघेही त्यांच्या मुलांना वेळ देताना दिसत आहेत.
आज विराट कोहलीचा वाढदिवस असून अनुष्काने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चाहत्यांना एक अप्रतिम ट्रीट दिली आहे. अनुष्काने चाहत्यांना पहिल्यांदाच तिच्या मुलाची झलक दाखवली आहे. यावेळी तिने एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली आपल्या मुलाबरोबर आणि मुलीबरोबर उभा आहे. आज ५ नोव्हेंबरला विराट कोहली त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने हे सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल
मात्र, हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये फक्त हार्ट इमोजी आणि एव्हिलाय शेअर केला आहे. हा नुसता फोटो असून यांत काहीही न बोलता सर्व काही सांगण्यात आलं आहे. या छायाचित्रात मुलांबरोबर वडिलांची मस्ती पाहून दोन्ही कलाकारांचे चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. या पोस्टवर एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “आम्ही खूप दिवसांपासून याची वाट पाहत होतो”. अनेकांनी विराटला ‘हमारा किंग’ असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाआधी कोणालाच सुगावा लागला नाही आणि इटलीतील टस्कनी येथे झालेल्या या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर आले. या लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अनुष्काने ११ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव तिने वामिका ठेवले. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा अकायचा जन्म झाला. अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आणि गरोदरपणात ती बहुतांश वेळ तिथेच राहिली.