सध्या सर्वत्र एकाच शोची चर्चा सुरु आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची. बिग बॉस मराठीचे नवीन पाचवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे नवीन पर्व हळूहळू प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या नवीन पर्वाला सुरु होऊन नुकतेच सात दिवस झाले आहेत. यामुळे घरातील स्पर्धकांबद्दलही हळूहळू प्रेक्षक जाणून घेत आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा देत आहेत, टर जॉ नाही आवडत त्याबद्दल सोशल मीडियाद्वारे टीका टिप्पणीही करत आहेत, बिग बॉसच्या घरात वर्षा निक्की यांच्यातील वाद सर्वांनाचं माहीत आहेत. त्यांच्या या भांडणाबद्दल अनेक कलाकार व प्रेक्षकांनी आपली मतं व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी निक्कीच्या वागण्यावर टीका करत वर्षताईंना पाठींबा दिला होता. अशातच घरातील आणखी एका स्पर्धकालाही पाठींबा देण्यात आला आहे.
घरातील पॅडी कांबळेसाठी त्यांची सहअभिनेत्री व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधील विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. “तू तिथे त्यांच्यासारखा नसलास तरीही तू खुप खरा आहेस. वेगळा आहेस. सज्जन आहेस. तारेवरची कसरत तुला कायमच जमली आहे. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव. तुझ्यातील चांगले गुण दाखवून दे. गप बसू नकोस. यारों का यार हैं तू. तुझ्या माणसांच्या मदतीसाठी तू उभा असतोस आज स्वतः साठी उभा रहा. मित्रा” असं म्हटलं आहे.
विशाखा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या असून या कमेंट्समध्ये काहींनी पॅडीला पाठींबा दिला आहे. तर काहींनी त्याचा खेळ आवडत नसल्याचे म्हटलं आहे. यापैकी एका नेटकऱ्याने विशाखा यांनी शेअर केलेल्या पोस्टखाली कमेंट्समध्ये “मुळात पॅडी तिथे गेलाच का?” असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे विशाखा यांनी असं उत्तर दिलं आहे की, “त्याच्या नशिबात आहे तिथे असणं. काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. आपण फक्त जिद्द ठेवायची म्हणून गेला आहे”.
आणखी वाचा – Video : लग्नानंतर बदलतो नवरा, जिनिलीया देशमुखच्या Birthday साठी रितेश देशमुखचा व्हिडीओ, म्हणाला, “बायको…”
दरम्यान, विशाखा व पॅडी कांबळे हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. याशिवाय गेली अनेक वर्षे ते सहकलाकारही आहेत. त्यामुळे कालच्या मैत्रीदिनाचे औचित्य साधत विशाखा यांनी पॅडीला शुभेच्छा दिल्या व त्याचे कौतुकही केलं आहे.