‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळालेली पाहायला मिळाली. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका संपून बराच काळ लोटला असला तरी आजही या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेमधून राधाची भूमिका अभिनेत्री वीणा जगताप हिने साकारली होती. या मालिकेमुळे विनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून वीणाच मालिकाविश्वात पदार्पण होत आणि हे पदार्पण तिच्या आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. पण अवघ्या काही महिन्यातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Veena Jagtap New Serial)
त्यानंतर वीणा ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामध्ये दिसली. या कार्यक्रमामुळे तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या शोमध्ये तिचे शिव ठाकरेबरोबर प्रेमबंध जुळले. शोनंतर दोघेही अनेक ठिकाणी एकत्रित दिसून आले. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तेव्हा वीणा खूप दिवस मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली दिसून आली. त्यांनतर वीणाने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ या मालिकेत कॅमिओ रोल साकारताना दिसली.
यानंतर आता वीणाने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेच्या नव्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत कोणते कलाकार झळकणार हे पाहायला मिळालं. या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापही दिसत आहे.
आणखी वाचा – “खेळ प्रामाणिक आहे पण…”, निक्की तांबोळीबाबत मेघा धाडेचं वक्तव्य, म्हणाली,”खूप चांगली संधी…”
हा प्रोमो पाहून प्रोमोखाली कमेंट करत अनेकांनी वीणाचं कौतुक केलं आहे. “वीणा जगताप खूप सुंदर दिसत आहे. ती मुख्य भूमिकेत पाहिजे होती तर मालिका पहायला जास्त मजा आली असती”, वीणाला पण मुख्य सकारात्मक भूमिकेत ठेवा. कारण वीणाचे संपूर्ण महाराष्ट्रात खूप चाहते आहेत. लोकांना मुख्य अभिनेत्री ही नेहमी सुंदरच आवडते”, अशा अनेक कमेंट करत वीणाला मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल असं म्हटलं आहे.