Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या नवनवीन नाती तयार होताना दिसत आहेत. या पर्वात अनेकांचं मैत्रिणीचं, बहीण-भावाचं नातं पाहायला मिळालं. यंदाच्या रक्षाबंधनला ‘बिग बॉस’च्या घरात बहीण भावाची नाती बनलेली दिसली. या पर्वात डीपी आणि अंकिता वालावलकर यांचं बहीण भावाचं नातं पाहायला मिळालं. अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता व डीपी एकत्र खेळताना दिसले. दोघेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्यांनी ‘बिग बॉस’मध्ये एण्ट्री घेतली. मात्र आता अंकिता व डीपी यांच्या नात्यात दुरावा येतो की काय अशी भीती वाटू लागली आहे.
नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत अंकिताने डीपी व वैभव या जोडीला नॉमिनेट केलं. जान्हवी व सूरजला सेफ करत अंकिताने डीपी व वैभव या जोडीला नॉमिनेट केलं. आणि वैभवला नॉमिनेट करायचं आहे असं म्हणत तिने वैभवला नॉमिनेट केलं. डीपी दादा गेम चांगला खेळत आहेत, पण सध्या ते कन्फ्युज दिसत आहेत आणि त्यांनी त्यांचा गेम सुधारावा म्हणून मी त्यांना नॉमिनेट करत आहे, असं म्हणत तिने डीपी दादांच्या नॉमिनेशनच कारण दिलं.
अंकिताने नॉमिनेशन प्रक्रियेत डीपीला नॉमिनेट केलं हे धनंजयच्या कुटुंबियांना खटकलं. धनंजयच्या पत्नी व आईने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत भाष्य केलं आहे. यांत धनंजयची आई सून कल्याणीला विचारते, “काय गं कल्याणी, काल जान्हवी धनंजयला सेफ करताना काय म्हणाली?”. त्यावर डीपीची पत्नी म्हणते, “जान्हवी म्हणाली, यांचा खेळ आहे. दिवसभर आमची चर्चा झाली. सकाळपासून खेळाबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. पण ती चर्चा कुठेच दाखवली नाही मम्मी? तसंच अंकिता ताईंनी त्यांना नॉमिनेट केलं हे पटलं नाही. तुम्हाला पटलं?”. यावर डीपीची आई म्हणाली, “मला तर अजिबात पटलं नाही. वैभवमुळे तिने आपल्या धनंजयला नॉमिनेट केलं”. पुढे कल्याणी म्हणाली, “त्या त्यांचा खेळ सुधारावा असं म्हणत आहेत, पण हे कारण पटलेलं नाही”. पुढे डीपीची आई म्हणाली की, “मला तर अजिबात पटलं नाही. याबद्दल जनतेला काय वाटतं? हे त्यांनी सांगावं, असं माझं म्हणण आहे.
या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी डीपीची बाजू घेत अंकिताला ट्रोल केलं आहे. “अंकिता selfish आहे आम्हाला पण नाही पटलं”, “आता अंकिता डबल ढोलकी वाटते आहे”, “मला पण नाही पटलं अंकिताच असं वागण”, असं म्हटलं आहे. तर काहींनी अंकिताची बाजू घेत, “काळजी नसावी. डीपी दादा सुरक्षित होणार याची अंकिताला खात्री आहे. नॉमिनेट करण्याचं प्रमुख कारण वैभव होता आणि आहे. आता बीबीने त्या जोड्या केल्यामुळे हा गोंधळ झाला”, “तिला पण माहित आहे डीपी भाऊ नाही जाणार”, “अहो अंकिताने डोकं लावलं कारण तिला माहित आहे dp दादा बाहेर जात नाही वैभव कायम डेंजर झोनमध्ये असतो त्यामुळं तिने केलं”, “आई, वहिनी अंकिता रागवू नका. तिचा हेतू दादाला नाॅमिनेट करण्याचा नव्हता हे समजण्या इतके तुम्ही दोघी आहात”, अशा कमेंट केल्या आहेत.