Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी होतात. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहायला मिळतात. आता ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजत असून, या सीझनबद्दल आणि घरातील सदस्यांबद्दल मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. घराबाहेर अनेक कलाकार मंडळी व प्रेक्षक मंडळी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या वागणुकीवर भाष्य करत आहेत. अनेक स्पर्धकांचे बोलणे खटकत असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी स्पर्धकांना टोला लागवलेला पाहायला मिळत आहे. यापूर्वीही ‘बिग बॉस’ विजेती मेघा धाडे हिनेदेखील घरातील सदस्यांबाबत भाष्य केलं आहे.
बिनधास्त, रोखठोक न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात सिनेविश्वातील बरीच कलाकार मंडळी अग्रेसर असलेली पाहायला मिळतात. बरेचदा ही मंडळी सोशल मीडियावरुन व्यक्त होतात. अशातच या कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाईल ते म्हणजेच मेघा धाडे. ‘बिग बॉस मराठी’ सीजन १ ची विजेती मेघा धाडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मधील स्पर्धकांबाबतही मेघा बरेचदा व्यक्त होताना दिसली आहे.
‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने ‘एंडेमोल शाइन इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्पर्धकांबाबत अनेक खुलासे केले. यावेळी निक्की तांबोळीच्या खेळाबद्दल विचारले असता तिने म्हटले, “निक्की तांबोळीचा खेळ प्रामाणिक आहे. मात्र ती चतुराईने खेळताना दिसते. इतकी चतुराई करण्याची गरज नसते. तिला वाटते की आपण जेवढा चिवचिवाट करेन तेवढी मी दिसेन. पण ‘चोर चोरीसे जाए, पर हेराफेरी से ना जाए’,असं तिच्याबाबत झाले आहे. तिला खूप चांगली संधी होती, ती तिने गमावली असे मला वाटते.” असे मेघा धाडेने म्हटले आहे.
आणखी वाचा – “मला जोडीदार हवा आहे”, वयाच्या ५९व्या वर्षी आमिर खान अडकणार का लग्नबंधनात?, म्हणाला, “आधीच्या दोन्ही पत्नी…”
‘बिग बॉस मराठी’चे पाचव्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून निक्की तांबोळी मोठ्या चर्चेत आली. पहिल्याच आठवड्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घालत ती चर्चेत आली होती. त्यावेळी नेटकऱ्यांनी निक्कीला बरंच ट्रोलही केलं. सर्वत्र महाराष्ट्रातून वर्षा यांचा अपमान केल्याने निक्कीला खडेबोल सुनावले. यानंतर निक्कीने पॅडी कांबळे यांचा जोकर असा उल्लेख करत अपमान केला. हा अपमानही अनेकांना खटकला.