Aly Goni-Natasa Stankovic Break Up : हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक ही जोडी बरेच दिवसापासून चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा या कानावर ऐकू येत होत्या. त्यानंतर दोघांनी अधिकृतरीत्या घटस्फोटाची घोषणा केल्यापासून सर्वांनाच धक्का बसला. सध्या हार्दिक त्याच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. तर नताशा मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियामध्ये आहे. सध्या नताशा तिच्या लेकाला घेऊन मायदेशी परतली आहे. तिथे ती तिच्या मुलाला वेळ देताना दिसत आहे. नताशा व अगस्त्य एन्जॉय करतानाचे अनेलक फोटोही ती सोशल मीडियावरुन शेअर करत असते.
हार्दिक पांड्याबरोबर लग्न करण्यापूर्वी नताशाने टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट केले होते. दोघांनीही ‘नच बलिए’ या रिॲलिटी शोमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. नताशा व अली हे दोघे दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर वेगळे झाले. नताशाचे व अलीचे ब्रेकअप का झाले याबाबत आता अली गोनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. अली गोनीने अलीकडेच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. जिथे तो त्याच्या भूतकाळातील नात्याबद्दल बोलला. यावेळी बोलताना अलीने नताशाचे नाव न घेता ब्रेकअपचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा – “खेळ प्रामाणिक आहे पण…”, निक्की तांबोळीबाबत मेघा धाडेचं वक्तव्य, म्हणाली,”खूप चांगली संधी…”
अलीने पॉडकास्टमध्ये ब्रेकअपचे कारण सांगितले असल्याचं समोर आलं आहे. अली म्हणाला, “यापूर्वी माझे नाते खूप गंभीर होते. त्याचे कारण म्हणजे तिने मला सांगितले की, जेव्हा आपण लग्न करु तेव्हा आपण भविष्यात वेगळे राहू. मला ती गोष्ट आवडली नाही”. अली पुढे म्हणाला, “मी जिथे जाईन तिथे माझ्या कुटुंबाला घेऊन जाईन. मी माझे कुटुंब वेगळे करु शकत नाही. जगात कोणतीही शक्ती आली तरी मी सोडू शकत नाही”.
अली सध्या टेलिव्हिजनवरील लाफ्टर शेफमध्ये दिसत आहे. जिथे तो स्वयंपाक करत मजा-मस्ती करताना दिसत आहे. अलीच्या वैयत्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अली जस्मिन भसीनसह रिलेशनशिपमध्ये आहे. नताशाबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच तिने हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतला आहे. २०२० मध्ये त्यांचे इंटिमेट लग्न झाले होते. त्यानंतर, फेब्रुवारी २०२३ मध्ये, दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.