शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पैसे मागण्यासाठी लाज सोडून…”, उषा नाडकर्णींचा ‘त्या’ गाजलेल्या चित्रपटाबद्दल व निर्मात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यादिवशी मी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Usha Nadkarni said that she used to go to the producer's house at seven in the morning for money.

“पैसे मागण्यासाठी लाज सोडून...”, उषा नाडकर्णींचा ‘त्या’ गाजलेल्या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यादिवशी मी…”

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. मराठी नाटक, चित्रपट व मालिका अशा तिन्ही माध्यमांत अभिनय करत उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. मात्र अनेकदा त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल पैसे मिळाले नाहीत.

याबद्दल उषा नाडकर्णी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात भाष्य केलं. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मतदानाचा दिवस होता. त्यादिवशी मी आईकडे जायला निघाले होते आणि दारात चप्पल घालत होते. तितक्यात दोन पांढरे कपडे घातलेली माणसं येऊ उभी राहिली. तर मला असं वाटलं की, ते मतदानाचं काही सांगायला आले आहेत. कारण मी तेव्हा त्या दोघांनाही ओळखलं नाही. मग ते आत येऊ का असं म्हणाले. तर मी त्यांना या म्हटलं”.

आणखी वाचा – “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेत का?”, विशाळगड अतिक्रमणावरील सुप्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “मुस्लिम समाजाला…”

पुढे उषा यांनी असं म्हटलं की, “तेव्हा त्यांनी मला एका चित्रपटात म्हातारीची भूमिका कर असं म्हटलं. तो चित्रपट होता ‘घनचक्कर’. मात्र त्या चित्रपटामधून मला एक पैसाही मिळाला नाही. तो माणूस आता या जगात नाही. पैसे मागण्यासाठी मी लाज सोडून आणि लोकांचं ऐकून सकाळी सात वाजता, बिछान्यातून उठवायला त्यांच्या घरी जाऊन बसायचे. तर ते मिळाले की देतो असं म्हणायचे. मात्र तेही गेले आणि पैसेसुद्धा मिळाले नाहीत”.

आणखी वाचा – “पत्नी एकटीच घरी होती अन्…”, ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सांगितला चाहत्यांचा भयावह प्रसंग, म्हणाला, “दारुच्या नशेत…”

सुस्पष्ट आवाज, फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणं यामुळे उषा नाडकर्णींचा सिनेसृष्टीतला दबदबा आजही कायम आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘महासागर’, ‘पुरुष’, ‘गुरु’ या नाटकांमधून कामं केली. त्यानंतर त्या चित्रपट आणि मालिकाकडे वळल्या. सिनेसृष्टीत त्या ‘आउ’ म्हणून चांगल्याच लोकप्रिय आहेत.

Tags: marathi actressmarathi entertainment newsUsha Nadkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tisha Kumar Death

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचे कर्करोगाने निधन, उपचारादरम्यान वयाच्या २०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.