पंकज त्रिपाठीच्या ‘मिर्झापूर’ या सीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र या सीरिजची खूपच चर्चा सुरु आहे. या सीरिजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या सीरिजमधील सर्वच व्यक्तिरेखांना खूप पसंती मिळाली आहे. त्यापैकी लाला या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये अनिल जॉर्ज यांनी लालाची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमधील लाला यांचा एक डायलॉग खूप लोकप्रिय झाला होता. अभिनेत्याने त्यांना चाहत्यांबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले की, अनेक लोक त्याच्या घराबाहेर यायचे आणि त्याचा संवाद बोलून निघून जायचे. मात्र यापैकी काही चाहत्यांचा किस्सा हा खूपच भयावह आहे. याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं आहे.
‘डीएनए इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, अनिल जॉर्ज यांनी एका भयानक घटनेची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “एकदा ५-६ मुले रात्री साडे दहा वाजता माझ्या घरी आले होते. त्यावेळी मी घरी नव्हतो आणि माझी पत्नी एकटीच होती. ती मुले दारुच्या नशेत होती. ते माझ्या पत्नीला आम्हाला लालाला भेटायचे आहे. असं म्हणत होते. तेव्हा माझ्या पत्नीला खूप राग आला”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “कोणाच्या घरी जाण्याची ही योग्य वेळ नसल्याचे ती म्हटली. पण आम्ही खूप दुरुन आलो आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांना भेटायचं आहे असं ते सांगत होते”. यापुढे अनिल यांनी चाहत्यांबद्दल “जेव्हा मी भारताबाहेर काम करतो, तेव्हा तिथल्या चाहत्यांनाही भेटतो. बहुतेक लोक मला ‘मिर्झापूर’ या सीरिजमुळेच ओळखतात असं म्हटलं.
आणखी वाचा – अखेर चर्चा खऱ्या ठरल्या! हार्दिक-नताशा एकमेकांपासून कायमचे वेगळे, लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच मोडला संसार
दरम्यान, ‘मिर्झापूर ३’मध्ये लालाच्या पात्राचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या आधीच्या दोन सीझनमध्ये त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी आपली चांगलीच पसंती दर्शवली होती. ‘मिर्झापूर’ ही सीरिज सध्या Amazon Prime वर उपलब्ध आहे. मिर्झापूर फेम हा अभिनेता सध्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.