उर्मिला निंबाळकर ही मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘दुहेरी’ या मालिकेतून तिने मराठी मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. तसेच हिंदीमधील ‘दिया और बाती हम’, ‘मेरी आशिकी तुमसेही’ या मालिकेतून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. मात्र गरोदरपणानंतर ती अभिनयापासून दूर गेलेली पाहायला मिळाली. तिला एक मुलगा असून त्याच्याबरोबर ती वेळ घालवताना दिसत आहे. युट्यूबच्या माध्यमातूनदेखील तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (urmila nimbalkar new post)
उर्मिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. युट्यूबच्या माध्यमातून ती अनेक माहितीपर व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. आता तिने केलेल्या एका स्टोरीमुळे ती चर्चेत आली आहे. तिने पोळ्या करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “मी शूटिंग करते, काम करते, कंपनी चालवते, मेकअप करते म्हणून खूप लोकांना असं वाटतं की मला स्वयंपाक करता येत नाही. पहाटे उठून विस्कटलेल्या अवस्थेत अथांगला डब्यासाठी पुऱ्या करुन देणारी आई आणि इतर सर्व भूमिका करणारी एकच व्यक्ती आहे याचा हा एक पुरावा”.

उर्मिलाने हे लिहून तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. एक किती जबाबदाऱ्या पार पाडू शकते असे तिने दाखवून दिले आहे. एक मुलगी, बायको, आई, गृहिणी, व्यावसायिका म्हणून सर्व कामं एकत्र करता येतात असा टोलादेखील ट्रॉलर्सना तिने लगावला आहे.
उर्मिला ही प्रसिद्ध व लोकप्रिय युट्यूबर आहे. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. फॅशन,मेकअप व कपडे याबाबतीतील अनेक व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात. तिच्या सर्व व्हिडीओना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते.