‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरा काही महिन्यांपूर्वी मालिकेत अधिपतीच्या खऱ्या आईला म्हणजेच चारुलताला घेऊन आल्याचं पाहायला मिळालं. पण, ही चारुलता नसून भुवनेश्वरीच आहे हे तिला काही दिवसांनी लक्षात येतं. बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)
घरातल्यांसमोर सासूचा हा मोठा डाव अक्षरा उघड करते. पण, भुवनेश्वरी मोठ्या हुशारीने सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर सुनेला खोटं सिद्ध करून वेडं ठरवते. सध्या अक्षराची रवानगी रुग्णालयात करण्यात आलेली आहे. इथून बाहेर पडण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. पण, काही केल्या अक्षराला ते शक्य होत नाही. नर्स, डॉक्टर या सगळ्यांना भुवनेश्वरीने आधीच पैसे दिलेले असतात. अधिपतीला हे सगळेजण इथे कोणीच आलेलं नाही असं सांगतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागात अक्षराने हॉस्पिटलमधून नर्सचा वेश बदलून पळ काढला.
चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं. त्यामुळे अक्षरा चारुहास व चारुलता (भुवणेश्वरी) यांचा लग्न थांबवण्याचा निर्णय घेते आणि यासाठी ती हॉस्पिटलमधून पळ काढते. अशातच आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षराने चारुलता ही भुवनेश्वरीच असल्याचे सिद्ध केले आहे. या प्रोमोमध्ये चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी चारुहासची मायफे मागत असं म्हणते की, “माफ करा आम्ही इथे चारुलताचे रूप घेऊन आलो”. यावर चारुहास चिडून असं म्हणतात की, “तुझी लायकी नाही तिचं नाव घ्यायची, चारुचं रूप घेऊन तू आमच्या भावनांशी खेळली आहेस. इथून निघून जा”.
यापुढे भुवनेश्वरी (चारुलता) असं म्हणते की, “आम्ही हे जे काही केलं ते तुमचं आणि अधिपतीचे प्रेम जिंकण्यासाठी केलं. आता तुम्हीच न्याय करा. आमची फसवणूक मोठी? की आमचं प्रेम?”. त्यामुळे आता चारुहास व अधिपती भुवनेश्वरीला तिच्या चुकीसाठी माफ करणार का? यामध्ये अक्षरा काय भूमिका घेणार? आणि अक्षरा तिला वेड लागले नसल्याचे सिद्ध करणार का? हे आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.