शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा तावडेचंही ठरलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर विवाहबंधनात अडकणार, केळवणाला सुरुवात

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 9, 2024 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actress Titeekshaa Tawde and actor Siddharth Bodke announces their relationship with shared photo on social media see the details

तितीक्षा तावडेचंही ठरलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर विवाहबंधनात अडकणार, केळवणाला सुरुवात

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. कारण या महिन्यात येतो तो ‘व्हॅलेंटाईन डे’. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो आणि याआधी ७ दिवसांपासून चॉकलेट डे, प्रॉमिस डे, प्रपोज डे सारखे काही खास दिवसही साजरे केले जातात. अशातच नुकताच काल (९ फेब्रुवारी) रोजी प्रपोज डे पार पडला आणि याच खास दिवसाचे औचित्य साधत एका मराठमोळ्या जोडीने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके.

खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. त्यांचे एकत्र फोटो व व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र दोघांनी आजवर कधीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले नव्हते. अशातच काल तितीक्षा-सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर त्यांचा एक खास फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तितीक्षाने सिद्धार्थ बरोबरचा केळवणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितीक्षाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघेही प्रेमात आकंठ बुडालेल्या एका प्रेमीयुगुलाप्रमाणे एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. हा क्युट फोटो शेअर करत तितीक्षाने “त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं” असं गोड कॅप्शनही दिलं आहे. या फोटोमध्ये तितीक्षाने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली आहे, तर सिद्धार्थनेही तिच्या साडीला साजेसा असा शर्ट परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “दोघांचे संबंध असल्याचं…”, स्वतःच्या मित्रावरुन पत्नीवर संशय घ्यायचे रवींद्र महाजनी, गश्मीरच्या आईचा गौप्यस्फोट, म्हणाल्या, “माझ्यावरचा विश्वास…”

दरम्यान, दोघांनी त्यांचा हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्सद्वारे वर्षाव केला आहे. मराठी मनोरंजन विश्वातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हृता दुर्गुळे, सुयश टिळक, रसिका सुनील, पल्लवी पाटील, सानिया चौधरी, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, गौतमी देशपांडे, गौरी नलावडे, दीपा चौधरी, ऐश्वर्या नारकर यांसह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – जीवघेणा अपघात, ऑपरेशन अन्…; अशोक सराफ यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच आईचं झालं होतं निधन, शेवटचं पाहताही आलं नाही आणि…

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर सिद्धार्थ ‘दृश्यम २’ या बॉलिवूड चित्रपटात व नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actressmarathi couplemarathi entertainment newsMarathi newssiddharth bodketiteekshaa tawdeतितीक्षा तावडेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी कपलमराठी कालाकारमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसिद्धार्थ बोडके
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Suruchi Adarkar Piyush Ranade

बायकोला डोसा बनवून देत आहे पियूष रानडे, स्वयंपाकघरात करत आहे मेहनत, सुरुची म्हणाली, "आधीच मी तुझ्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.