निवेदिता सराफ व अशोक सराफ ही जोडी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जगण्याची दिलेली उमेद याचं हुबेहूब उदाहरण म्हणजे अशोक व निवेदिता यांची जोडी. आयुष्यात घडलेले बरेच प्रसंग तसेच अडथळे पेलवत त्यांनी कायमच मार्ग काढला.आजही त्यांचे बरेच असे ऐकण्याजोगे किस्से आहेत जे ऐकून थक्क व्हायला होतं. मराठी इंडस्ट्रीतील मानाचं पान असणारे अशोक मामा याना भेटण्याचं स्वप्न उरी न बाळगणारे खूप कमी कलाकार महाराष्ट्रात दिसतील. (Tejashri Pradhan On Nivedita Saraf and Ashok Saraf)
प्रत्येक कलाकाराला या दिग्गज जोडीला भेटण्याचा मोह आवरत नाही. अशातच दिवाळी सणानिमित्त एका लोकप्रिय अभिनेत्रीने अशोक मामा व निवेदिता सराफ यांच्या भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. ही भाग्यवान अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या भेटीने तेजश्रीची यंदाची दिवाळी अधिक खास झाली असल्याचं तिने फोटो शेअर करत म्हटलं आहे. तेजश्रीने याआधी निवेदिता सराफ यांच्याबरोबर मालिकेत काम केलं होतं. अग्गबाई सासूबाई या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दिवाळीनिमित्त निवेदिता व अशोक सराफ यांच्या घरी तेजश्रीने भेट दिली.
तेजश्रीने ‘माझी दिवाळी पूर्ण करण्यासाठी काही भेटी होणं आवश्यक आहे’ असं कॅप्शन देत निवेदिता व अशोक सराफ यांच्याबरोबरचे फोटोस शेअर केले. यावेळी निवेदिता व तेजश्री यांचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. या भेटीचा आनंद तेजश्रीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. या तिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिला जावा असा अभिनय करणारे अभिनेते अशोक सराफ यांना भेटण्याची इच्छा नसलेला व्यक्ती या महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. केवळ सामान्य माणूसच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना ही अशोक सराफ यांना भेटण्याचा मोह आवरत नाही. त्यांना भेटून त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा अनेक कलाकारांना पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणा देत असणार एवढं नक्की. आणि म्हणून तेजश्रीने ही खास भेट विशेष पोस्ट लिहीत शेअर केली.