गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Home - नव्या घरात प्रसाद खांडेकरची कुटुंबिय-मित्रपरिवारासह जल्लोषात दिवाळी, म्हणाला, “गाठीभेटी…”

नव्या घरात प्रसाद खांडेकरची कुटुंबिय-मित्रपरिवारासह जल्लोषात दिवाळी, म्हणाला, “गाठीभेटी…”

Majja WebdeskbyMajja Webdesk
नोव्हेंबर 15, 2023 | 10:32 am
in Marathi Masala
Reading Time: 3 mins read
maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared diwali special photos on social media with his friends and family

नव्या घरात प्रसाद खांडेकरची कुटुंबिय-मित्रपरिवारासह जल्लोषात दिवाळी, म्हणाला, "गाठीभेटी..." | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared diwali special photos on social media with his friends and family

सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या प्रियजनांसह यंदाचा दिवाळी सण साजरा करत आहे. अशातच मराठीतील कलाकारदेखील दिवाळी साजरी करण्यात व्यस्त आहेत. ते दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेता प्रसाद खांडेकर याने देखील यंदाची दिवाळी त्याच्या कुटुंबीय व प्रियजनांबरोबर साजरा केली आहे. याचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (Prasad Khandekar Shared Diwali Special Photos)

प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दिवाळीनिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो त्याचे मित्र आणि कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसत आहे. प्रसादने शेअर केलेला पहिला फोटो हा त्याच्या नवीन घरातला असून या फोटोत हास्यजत्रेमधील कलाकार प्रथमेश शिवलकर दिसत आहे. त्याचबरोबर त्याचे काही इतर मित्रदेखील दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये प्रसादचे मित्र त्यांच्या कुटुंबीयांबरोबर दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोतदेखील प्रसादने त्याच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबीयांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

आणखी वाचा – निरागस चेहरा, आगळीवेगळी हेअरस्टाईल अन्…; ‘या’ फोटोतील चिमुकल्याला ओळखलं का? आज आहे मराठीतील दिग्गज अभिनेता

हे फोटो शेअर करत प्रसादने “ह्या गाठीभेटीसाठीचं मला दिवाळी सण जास्त आवडतो” असं हटके कॅप्शनदेखील लिहिलं आहे. यापुढे प्रसादने असे म्हटले आहे की, “भेटा, गप्पा मारा, हसा, आठवणी शेअर करा, फराळ खा, फराळाची देवाणघेवाण करा, छान छान कपडे घाला, मिरवा, खर्च करा, मिठाई वाटा, गिफ्ट्स द्या, गिफ्ट्स घ्या, आशीर्वाद घ्या, आशीर्वाद द्या आणि चैतन्याची उधळण करा…” यापुढे त्याने त्याच्या चाहत्यांना “यंदाची दिवाळी तुम्ही देखील आनंदाने साजरी करा” असं म्हणत दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘मुलगी झाली हो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह करत मारला फेरफटका

दरम्यान आपल्या विनोदी अभिनयाने कायम चर्चेत असणाऱ्या प्रसादचा येत्या काही दिवसांतच ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिलावहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटासाठी तो तर उत्सुक आहेच. पण त्याच्या चाहतेदेखील या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत.

Tags: maharashtrachi hasy jatramarathi actorprasad khandekar

Latest Post

marathi actress hemangi kavi shared facebook post for appreciating hemant dhome, nirrmite saawaant rinku rajguru and jhimma 2 movie
Marathi Masala

“मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर हेमंगी कवीने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाली “निर्मिती ताई तू कारणीभूत असशील कारण…”

नोव्हेंबर 30, 2023 | 7:13 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Promo
Television Tadka

अखेर ‘तारक मेहता’मध्ये होणार दयाबेनची एंट्री? जेठालाल, बापूजींनी केला खुलासा, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

नोव्हेंबर 30, 2023 | 6:21 pm
Fatima cried due misbehavior in party by girl
Bollywood Gossip

“दारुच्या नशेत तिने मला…”, पार्टीमध्ये ‘दंगल’ फेम फातिमा शेखबरोबर बरोबर घडला धक्कादायक प्रकार, म्हणाली, “उद्धट होती आणि…”

नोव्हेंबर 30, 2023 | 6:11 pm
maharashtrachi hasyajatra fame gaurav more not able to talk english within london misal movie shooting see the details
Marathi Masala

इंग्रजी भाषा बोलता येत नाही म्हणून भलतीच शक्कल लढवतो गौरव मोरे, लंडनमध्ये गेल्यावर केलं असं काही की…; म्हणाला, “मित्रांना फोन करुन…”

नोव्हेंबर 30, 2023 | 6:05 pm
Next Post
Sonali Patil share a post for her Grandmother

"चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा…", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची आजीसाठी खास पोस्ट, म्हणाली, "तिच्या संस्कारामध्ये वाढले आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist