रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पप्पा घराच्या ओट्यावर बसून…”, वडिलांच्या आठवणीत कुशल बद्रिके भावुक, तुमचेही डोळे पाणावतील, म्हणाला, “तेच आयुष्यात नाही आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 15, 2023 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike celebrates Diwali

"पप्पा घराच्या ओट्यावर बसून…", वडिलांच्या आठवणीत कुशल बद्रिके भावुक, तुमचेही डोळे पाणावतील, म्हणाला, "तेच आयुष्यात नाही आणि…"

सध्या देशभरात दिवाळीचा माहोल आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार मंडळींमध्ये दिवाळीचा वेगळाच उत्साह यावेळी पाहायला मिळतो. अनेक कलाकार त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत त्यांच्या कुटुंबासह दिवाळी साजरी करत आहे. त्यासंबंधीचे अनेक फोटोज व व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काही कलाकारांनी स्वतःचं घर खरेदी केलं, तर काहींनी नवीकोरी कार. त्याचबरोबर, काही कलाकार विविध पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहे. अशात, छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिकेने यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. (Kushal Badrike celebrates Diwali)

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळी साजरा करतानाचे काही फोटोज व व्हिडीओज शेअर केले. ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबियांसह फटाके फोडताना दिसला. त्याने यावेळी हिरव्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचा पायजमा असा पारंपरिक लूक परिधान केला. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तसेच, या फोटोमध्ये त्याच्या हातात लवंगी फटाके दिसत असून तो त्या फटाक्यांची माळ फोडताना दिसतो. हा फोटो शेअर करताना त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली, ज्यामुळे तो भावुक झाला.

हे देखील वाचा – दिवाळीनिमित्त अशोक सराफांच्या घरी पोहोचली तेजश्री प्रधान, पण भाव खाऊन गेल्या निवेदिता सराफ, मंगळसूत्राने वेधलं लक्ष

कुशल या पोस्टमध्ये म्हणाला, “आमच्या लहानपणी, दिवाळीतील फटाके म्हणजे सोशल मीडियावर पेटवला जाणारा प्रदूषणाचा मुद्दा नव्हता. जसं आकाश कंदील, रांगोळी, दिवे, ऊटण असतं तसंच फटाकेही असायचे. आमच्या लहानपणी, आम्ही फटाके फोडत असताना माझे पप्पा घराच्या ओट्यावर बसून आमच्यावर लक्ष ठेवायचे. लवंगी फटाक्यांच्या माळेला जी पुढे गाठ असते, ती सोडवून एक-एक फटाका सुटा करून द्यायचे. त्यामुळे माझी दिवाळी खूप वेळ वाजत राहायची.”

हे देखील वाचा – “चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची आजीसाठी खास पोस्ट, म्हणाली, “तिच्या संस्कारामध्ये वाढले आणि…”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

“आता मात्र फटाके फोडायला वेळेची बंधन आहेत, पण फटाक्यांचं स्वरुप कमालीच बदललं. आता बाजारात डोळ्यांना दिपवून टाकणारे, आसमंत उजळवून टाकणारे, वेगवेगळे रंग आणि आवाज काढणारे, एका भुईचक्रातून असंख्य भुईचक्र निघणारे, भारावून टाकणारे असे फटाके मिळतात. हल्लीची दिवाळी खूप भारी असते. फक्त तो गाठी सोडवून देणारा माणूस आयुष्यात राहिला नाही एवढाच.”, असं म्हणताना तो यावेळी भावुक झाला. त्याची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत असून कमेंट्सद्वारे नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Tags: chala hawa yeu dyakushal badrikeKushal Badrike celebrates Diwalimarathi actor
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Sankarshan Karhade Poem

"फार गोड वाटते परदेशाची वारी…", संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, म्हणाला, "जेव्हा गोऱ्यांचं पोर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.