बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांच्या मताशी मी सहमत पण…”, अशोक सराफ यांच्या वक्तव्यावर हेमंत ढोमे-क्षिती जोगचं वक्तव्य, म्हणाले, “आताची परिस्थिती…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2023 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jhimma 2 starcast hemant dhome kshitee jog siddharth chandekar nirmitee sawant sawant talk about marathi movie promotion in its majja round table show

"त्यांच्या मताशी मी सहमत पण…", अशोक सराफ यांच्या वक्तव्यावर हेमंत ढोमे-क्षिती जोगचं वक्तव्य, म्हणाले, "आताची परिस्थिती…"

२०२३ हे वर्ष आता संपायला आले असून सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातील काही घटना, प्रसंगांना अनेक उजाळा देत आहेत. अशातच यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांनी चांगलीच कामगिरी केली. यंदा मराठीत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यात ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘सरला एक कोटी’, ‘टर्री’, ‘फुलराणी’, ‘रौंदळ’, ‘सातारचा सलमान’, ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘झिम्मा-२’ यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यांपैकी ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ व ‘झिम्मा-२’ या चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. ‘झिम्मा २’ हा चित्रपट आजही चित्रपटगृहांमध्ये टिकून आहे. या चित्रपटाने आतापर्यंत मोठी कमाई केली असून अजूनही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. अशातच गत वर्षाला निरोप देताना ‘इट्स मज्जा’ने ‘झिम्मा-२’च्या कलाकारांबरोबर ‘राऊंड टेबल’ हा खास मुलाखतीचा कार्यक्रम केला. यात ‘झिम्मा-२’ मधील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे व या चित्रपटाची निर्माती व अभिनेत्री क्षिती जोग यांनी सहभाग घेतला होता. (Majja Round Table With Jhimma 2 Team)

“सध्या मराठी चित्रपट बघायला प्रेक्षकांना बोलावणे हे खुप दुर्दैवी आहे” असे मत अशोक सराफ यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात मांडले होते. अशोक सराफ यांच्या या वक्तव्यावरुन या कलाकारांनाही प्रमोशनचा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षिती जोग उत्तर देत असं म्हणाली की, “अशोक मामांचं हे मत मला कळत आहे. पण सध्याचा काळ हा अनेक पर्यायांचा आहे. २० वर्षांपूर्वी आजच्या इतकी माध्यमे उपलब्ध नव्हती. २० वर्षांपूर्वी फक्त मराठी चित्रपट आणि काही चॅनेल्स उदयास आले होते. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. मात्र आता तशी परिस्थिती नाही आहे. आता ओटीटी व इंटरनेटमुळे प्रेक्षकांना अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आता अनेक पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना नवीन चित्रपटाची आठवण करुन देणे गरजेचे आहे.”

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “माझे पाय चाट आणि…”, आयेशा खान अंकिता लोखंडेला नको नको ते बोलली, अभिनेत्रीला राग अनावर, म्हणाली, “तुझी मर्यादा…”

यापुढे हेमंतने असे म्हटले की, “पूर्वीच्या काळी मनोरंजन हे दुर्मिळ होते. पूर्वी एखाद्याच्या घरी भजन, जागरण, गोंधळ असला तर लोक ते पाहण्यासाठी एकत्र जमायचे. पण आता मोबाईल व इंटरनेटमुळे ते सहजसोपे झाले आहे.” तसेच निर्मिती सावंत यांनीही “पूर्वीच्या काळी प्रमोशनची पद्धत वेगळी होती. तेव्हा फक्त वर्तमानपत्रात जाहिरात यायची. पण आता नाटकाचा प्रेक्षकही नाट्यगृहाबाहेर न जाता मोबाईलवर नाटकाची तिकीटे बुक करतात.” असं म्हटलं. तर सिद्धार्थनेही यापुढे त्याचे मत मांडताना असे म्हटले की, “सध्याचा काळ मनोरंजनाच्या दृष्टीने कमी झाला असून सर्वांना ३० सेकंदांचे रील व्हिडीओ बघण्याची सवय झाली आहे. त्यामुळे अशा प्रेक्षकांना दोन तासाचा चित्रपट बघायला बोलावण्यासाठी प्रमोशन हे करावेच लागते.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेते विजयकांत यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, राजकारणातही होते सक्रिय, कलाकारही हळहळले

दरम्यान, ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून या चित्रपटाने पाचव्या आठवड्यातही यशस्वी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉलिवूडच्या शाहरुख खान व प्रभास यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या ‘डंकी’ व ‘सालार’बरोबर बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवले आहे. त्यामुळे चित्रपटाचे व चित्रपटातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.      

Tags: entertainment newshemant dhomejhimma 2kshitee jogmarathi actorsmarathi actressmarathi entertainmentmarathi movieMarathi newsnirmiti sawantsiddharth chandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Hina Khan Health Update

सतत ताप, ताकदही नाही अन्…; अभिनेत्री हिना खान रुग्णालयात दाखल, म्हणाली, "शेवटच्या चार रात्री…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.