बिग बॉस फेम प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही मराठमोळी जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. बिग बॉस मध्ये असताना त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर बाहेर येताच त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली. मग काही दिवसांनी गपचूप साखरपुडा आणि मग काही दिवसांनी शाही लग्नसोहळा असा प्रेमाचा प्रवास करत त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच त्यांच्यावर चाहत्यांसह मराठीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अशातच त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. (Surekha Kudachi On Instagram)
या फोटोत प्रसाद-अमृतासह ‘बिग बॉस’मधील आणखी एक स्पर्धक व नृत्यांगना सुरेखा कुडची दिसत आहेत. प्रसाद-अमृताबरोबरचे फोटो शेअर करत त्यांनी एक खास पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “कोण कधी कुठे भेटेल काही सांगता येत नाही. पुणे-मुंबई प्रवास करताना फूड मॉलला थांबले तर अचानक समोर आपली सगळ्यांची लाडकी अमृता व प्रसाद हे नवीन लग्न झालेले जोडपे आलं. त्यांना बघून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मग त्यांच्याबरोबर एक फोटो काढला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.”
यापुढे, त्यांनी “बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम हे बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं. आतापर्यंत असंच पाहिलं आहे पण हे दोघे त्याला अपवाद आहेत. खूप मनापासून आनंद झाला. पुढील वाटचालीसाठी या दोघांनाही खूप शुभेच्छा.” असं म्हणत त्यांनी हा खास फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केला आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ नंतरदेखील सुरेखा यांचे प्रसाद अमृता बरोबरचा हा खास बॉण्ड चाहत्यांनाही भलताच आवडला आहे.
दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी अनेक लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर या पोस्टखाली अनेकांनी अमृता-प्रसाद यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद-अमृता गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अशातच सुरेखा यांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत