गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सेटवर दोन तास रिकाम्या मिळालेल्या वेळेमध्ये जुई गडकरी काय करते?, स्वतःच व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 6, 2023 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
jui gadkari share a video

jui gadkari share a video

‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेत वेळोवेळी आलेली वळणं प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवतात. सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जूई गडकरी तर प्रेक्षकांच्या बरीच आवडीची आहे. तिचा मालिकेतील साधा, सोज्वळ स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावतो. जुई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती बऱ्याचदा सेटवरील मजामस्तीचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिने सेटवरील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (jui gadkari share a video)

जुईने शेअर केलेला व्हिडिओत दुपारी २ ते ४ च्या दरम्यान सेटवर काय चालू असतं हे दिसत आहे. मालिकेतील कलाकार मंडळी एका बाजूला एकत्र मजामस्ती करत चित्रीकरण करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जुई मोबाईलवर वेळ घालवताना दिसत आहे. पण काही काळानंतर ती मोबाईल चालूच ठेवून झोपून गेलेली दिसते.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा -“हा तर दारुच्या नशेमध्ये आहे”, जिनिलिया देशमुखसमोरच पार्टीमधून बाहेर येताना आमिर खानचा गेला तोल, नेटकरी म्हणाले, “हा छपरी…”

या व्हिडिओला तिने कॅप्शन देत लिहिलं, ‘जेव्हा दुपारचे २ ते ४ वाजलेले असतात , सहकलाकार शूट करत असताता तेव्हा माझी आवडती गोष्ट!’ असं लिहीत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून लाईक व कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने, ‘झोप महत्त्वाची’, असं लिहीत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘हे तर पुणेकरांच आवडतं काम’, असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – Video: बोल्ड संवाद, कॉमेडी अन्…; ‘बॉईज ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेचा लूक पाहून सर्वत्र होतंय कौतुक

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या बरीच वळणं पाहायला मिळत आहेत. मालिकेत विसर्जनादरम्यान सायलीवर हल्ला झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या सायलीचे प्राण वाचवण्याची धडपड मालिकेत पाहायला मिळत आहे. सायलीला वाचवण्यासाठी ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगट आवश्यक आहे पण कोणाचाही रक्तगट तिच्याशी जुळत नाही. त्यामुळे आता या हल्ल्यामुळे मालिकेत काय वळण येतं व अर्जुन व सायलीच्या नात्याचं पुढे काय होतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: fame jui gadkarishare a videoTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्याच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
aishwarya narkar angry

“आपली लायकी काय?”, ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर नवऱ्याने केला डान्स, ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या ऐश्वर्या नारकर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.