शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् छेड काढणाऱ्या चार जणांना प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बेदम मारलं, म्हणाली, “त्या पोरांना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 6, 2023 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Surabhi bhave reveales that she fight with four men

Surabhi bhave reveales that she fight with four men

मराठी मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्री त्यांच्या बेधडक अंदाजासाठी व स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सुरभी भावे. सुरभीने आतापर्यंत बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर तिने ‘पावनखिंड’ व ‘चंद्रमुखी’ सारख्या मराठी चित्रपटही काम केलं आहे. सुरभीने ‘स्वामिनी’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली होती. या मालिकेतून ती बरीच लोकप्रिय झाली. सध्या ती ‘भाग्य दिले तु मला’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.  सुरभी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने स्वतःचं युट्युब चॅनलही सुरुवात केले आहे. त्यावरून ती आपल्या कामाच्या तसेच कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची माहिती देत असते. तसेच समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईक गोष्टींबाबत स्वतःचं मत मांडताना दिसते. नुकतंच तिने एक किस्सा शेअर केला आहे ज्यात तिने चार जणांना चोप दिला असल्याचा खुलासा केला. (Surabhi bhave reveales that she fight with four men)

सुरभी सोशल मीडियासह युट्युबवरही बरीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. त्यावर ती विविध विषयांवर बोलताना दिसते. तसेच तिला आलेले अनुभव शेअर करताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तिने तिच्या शालेय जीवनातील आठवणी चाहत्यांसह शेअर केल्या.

View this post on Instagram

A post shared by Surabhi Bhave❤️ (@surabhibhave)

आणखी वाचा – Video: बोल्ड संवाद, कॉमेडी अन्…; ‘बॉईज ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेचा लूक पाहून सर्वत्र होतंय कौतुक

सुरभी सांगते, “मी मुळची कोकणातली गुहागरची आहे. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्येच झालं. पण माझ्या आयुष्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमुळे कलाटणी मिळाली. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली शाळा आहे. या शाळेच्या पहिल्याच बॅचची मी पासआऊट विद्यर्थीनी आहे”.

View this post on Instagram

A post shared by Surabhi Bhave❤️ (@surabhibhave)

आणखी वाचा – सेटवर दोन तास रिकाम्या मिळालेल्या वेळेमध्ये जुई गडकरी काय करते?, स्वतःच व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

याबद्दल ती पुढे सांगते, “त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. तिथे अभ्यासाबरोबर विविध गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यात स्विमिंग, योगा, रायफल शुटिंग, कराटे अशा प्रकारांचा समावेश होता. त्याशिवाय शाळेत सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं होतं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं”, हा किस्सा सांगत तिने आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितलेल्या किस्स्याचं व तिने दाखवलेल्या हिंमतीचं नेटकरी कमेंट करत कौतुक करत आहे.

Tags: lifestorymarathi actresssurabhi bhave
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Akshaya Deodhar post on Hardeek Joshi's Birthday

"तुझ्या मिठीत…", पाठकबाईंची नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पोस्ट, म्हणाली, "माझ्या आयुष्यातील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.