मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुकन्या मोने या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाबरोबरच त्या सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेल्या बघायला मिळतात. त्यांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्टदेखील व्हायरल होताना बघायला मिळतात. नुकतीच त्यांची एक पोस्ट समोर आली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे कौतुक केले आहे. दरम्यान मुलीबरोबरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. (sukanya mone viral post )
सुकन्या मोने व संजय मोने एक मुलगी असून तिचे नाव जूलिया असे आहे. जुलियाने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. याबद्दल सुकन्या यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्ट करत लिहिले की, “जुलिया संजय सुकन्या मोने. Master degree in animal science from University if Queensland Brisbane Australia मध्ये पदवी ग्रहण समारंभाला गेले होते. यावेळची काही स्मरणचित्र. हळूहळू सगळी पाठवत जाईन. आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करुन घ्यायला आवडेल”. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
सुकन्या यांच्या या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच अनेक कलाकारांनी जुलियाला व सुकन्या-संजय यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. क्रांती रेडकरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा जुलिया. तुला व संजय दादांना खूप खूप शुभेच्छा”. स्वानंदी टिकेकरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप अभिमान”. तसेच रसिका वेंगुर्लेकर, मुग्धा गोडबोले, भागयश्री लिमये यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान याआधीही सुकन्या यांनी अभिनेत्री नेहा गद्रेच्या डोहाळेजेवणासाठी ऑस्ट्रेलिया येथे उपस्थित राहिल्या होत्या. याबद्दल नेहाने सुकन्या यांचे आभार मानले आहेत. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे सुकन्या मोने यांच्याबबरोबरचे फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. “माझ्या या आनंदाच्या क्षणी तुम्ही सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत नेहाने सुकन्या यांचे आभार मानले आहेत. तर सुकन्या यांनीही नेहाच्या फोटोवर कमेंट करत “मलाही मज्जा आली, ऑस्ट्रेलियाला येऊन मला तुझं डोहाळे जेवण करता आलं”.