‘ऊन पाऊस’, ‘कळत नकळत’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. मालिकांसह ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावरही अनिकेतने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. पण काही वर्षांपूर्वी अनिकेत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आला होता. अनिकेतने २०१८ मध्ये अभिनेत्री स्नेहा चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचा हा संसार फक्त दोनच वर्ष टिकला. अवघ्या दोन वर्षांतच दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान स्नेहा पुण्यात आपल्या आईकडे राहत होती. (Sneha Chavan Second Marriage)
घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे. नुकतीच तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. स्नेहाने काल तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या हाताला मेहंदी लावल्याचे फोटो शेअर केले होते. त्याचबरोबर तिच्या मित्रमंडळींनीही आपल्या हाताला मेहंदी लावली असल्याचे काही फोटो शेअर केले होते. तसंच तिला तिच्या अनेक मित्र-मैत्रीणींनी शुभेच्छाही दिल्या होत्या. “हे होतंय याची वाट पाहू शकत नाही”, “प्रेम आणि खूप शुभेच्छा” असं म्हणत अनेकांनी फोटो व व्हिडीओ शेअर केले होते.
अशातच अभिनेत्रीने आज काही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्यावरुन स्नेहाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला तिच्या मित्रपरिवाराने लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या असून या स्टोरी स्नेहाने री-शेअर केल्या आहेत आणि या स्टोरीवरुन तिने दुसऱ्यांदा लग्न केल्याचे कळत आहे. या खास लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास भरजरी असा गाऊन परिधान केला होता आणि ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होती.
दरम्यान, अनिकेत विश्वासरावबरोबरच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री स्नेहा चव्हाणने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या कुटुंबीयांनी मोठी साथ दिली. आता तिच्या आयुष्यात तिचा नवीन जोडीदारही आला आहे. त्यामुळे स्नेहा आता पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगणार असून यात तिला तिच्या जोडीदाराचीही उत्तम साथ मिळेल. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.