बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुबोध भावेनंतर शिवानी सुर्वेच्याही नव्या मालिकेची घोषणा, अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा, प्रोमो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Surve New Serial

सुबोध भावेनंतर शिवानी सुर्वेच्याही नव्या मालिकेची घोषणा, अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा, प्रोमो व्हायरल

मराठमोळ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे. शिवानीने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही दिवसांपासून शिवानी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने अभिनेता अजिंक्य ननावरेसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी वेळात वेळ काढत फिरतानाही दिसली. ‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत दिसणार आहे. (Shivani Surve New Serial)

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही.

आणखी वाचा – साक्षीच्या हाती लागणार का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे?, सायली-अर्जुनच्या नात्यात ठरणार दुराव्याचं कारण अन्…; मालिकेत रंजक वळण

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते. मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करुन चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं असं तिला वाटतं. अशी ही मानसी मालिकेत धुमाकूळ घालणार आहे. तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे.

आणखी वाचा – सुबोध भावेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, लूक पाहून प्रेक्षकही भारावले

मालिकेबाबत मत व्यक्त करताना शिवानी म्हणाली, “‘स्टार प्रवाह’ कुटुंबाबरोबर पुन्हा एकदा जोडली जात आहे याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे”.

Tags: entertainmentmarathi serialshivani surveShivani Surve New Serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Prasad and Manjiri Oak wish their pet dog a happy birthday on the trending song Gulabi Sadi

गुलाबी टिकली, गुलाबी फ्रॉक अन्…; प्रसाद व मंजिरी ओक यांनी लाडक्या श्वानाचा केला नटापटा, ‘गुलाबी साडी’वरचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.