सोशल मीडियाच्या या युगात एखादी गोष्ट अगदी रातोरात ट्रेंड होते आणि अशा ट्रेंडिंग गोष्टींमध्ये सध्या एक गाणं चर्चेचा विषय ठरत आहे आणि ते गाणं म्हणजे ‘गुलाबी साडी’. सोशल मीडियावर सध्या गुलाबी साडी हे सर्वाधिक चर्चेत असलेलं ट्रेंडिंग गाणं आहे. संजू राठोडच्या या गाण्याने अगदी बॉलिवूडपासून ते मराठी मनोरंजन विश्वाला वेड लावले आहे. बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित असून ते डान्सर रेमो डिसूझा यांनीही या गाण्यावर ठेका धरला आहे.
बॉलिवूड कलाकारांबरोबरच मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या गाण्यावर डान्स करत हा ट्रेंड फॉलो केला आहे. अशातच आता यात आणखी एकाची भर पडली आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी ओक यांच्या पाळीव श्वानाने वाढदिवसानिमित्त हा गुलाबी गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे.
मस्कारा ओक या पाळीव श्वानाच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओक व मंजिरी ओक यांनी सोशल मीडियावर मस्काराचा एक खास व्हिडीओ पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ओक कुटुंबियांनी मस्काराचा खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मस्काराला गुलाबी फ्रॉक परिधान केला असून तिच्या कपाळाला गुलाबी टिकली अन् गळ्यात माळही परिधान केली असल्याची पाहायला मिळत आहे. तसेच या खास व्हिडीओला त्यांनी ‘गुलाबी गाणी’ हे ट्रेंडिंग गाणंही लावलं आहे. आणि या गाण्यावर मस्काराने हटके पोजेस दिल्याचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – सुबोध भावेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, लूक पाहून प्रेक्षकही भारावले
प्रसाद व मंजिरीनं सोशल मीडियावर मस्काराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता खानविलकर व स्वप्नील जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर मस्काराला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.